मिझोरम, 08 जुलै : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सध्या एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. यासाठी फ्रंट लाइन वॉरिअर म्हणून डॉक्टर आणि नर्स आपल्या परीनं काम करत आहेत. मात्र एक 46 वर्षीय व्यक्ती कोरोनानं निरोगी झालेल्या रुग्णांना क्वारंटाइन सेंटरमधून त्यांच्या घरी सोडण्याचे काम करत आहे. ही बातमी आहे मिझोरमची. या इसमाचे नाव इस्राइल लालरेमथ्लूंगा असून ते मिझोरमध्ये बाप्टिस्ट चर्चते मुख्य धर्मोपदेशक आहेत. इस्राइल स्वत: आपल्या गाडीतून रुग्णांना घरी पोहचवण्याचे काम करत आहेत. मुख्य म्हणजे यासाठी इस्राइल या रुग्णांकडून कोणतेही पैसे घेत नाही आहेत. हे काम ते विनामुल्य करत आहेत. वाचा- अभिमानास्पद! एका शेतकऱ्याचा मुलगा तयार करतोय पहिली मेड इन इंडिया लस ****लोकांना मदत करण्यासाठी सुरू केलं काम इस्राइल यांनी नॉर्थ इस्ट नाउला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकं मिझोरममध्ये आपल्या घरी येत आहेत. काहींना घरात तर काहींना गावाबाहेर क्वारंटाइन केलं जात आहे. 14 दिवसांनी पुन्हा घरी येण्यासाठी कोणतंही साधन नसल्यामुळं लोकांना पायी चालत यावं लागत होतं. त्यामुळं मी लोकांना मोफत घरी सोडण्यास सुरुवात केली. वाचा- ‘या’ देशात आढळलं माणसाच्या उंचीएवढं वटवाघूळ? PHOTO बघून बसेल धक्का गाडीत केली विशेष सेवा इस्राइल यांनी आपली गाडी सिंगल सीट केली आहे. मागच्या सीटवर त्यांनी पॉलिथीन लावला आहे. ज्यामुळं रुग्ण आणि त्यांच्यात अंतर राहते. मुख्य म्हणजे त्यांना ही गाडी सासऱ्यांनी भेट दिली होती. इस्राइल यांनी असेही सांगितले की, ते आपल्या नावाची चर्चा व्हावी यासाठी हे सगळं नाही करत आहेत. वाचा- VIDEO: ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत आता Robot ‘गोलर’ची मदत, रुग्णांना देणार औषधं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







