'आशिर्वाद असू द्या पाठीशी', देवेंद्र फडणवीसांचे 'अभिमन्यू' मुलासह कोरोनाबाधित!

'आशिर्वाद असू द्या पाठीशी', देवेंद्र फडणवीसांचे 'अभिमन्यू' मुलासह कोरोनाबाधित!

लातूरमधील आरोग्य व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच लातूर येथेच पुढील उपचार घेण्याचा मी निर्णय घेतला आहे.

  • Share this:

लातूर, 08 जुलै : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले औसाचे आमदार अभिमन्यु पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

अभिमन्यु पवार यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या बरोबर त्यांच्या मुलाला देखील कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

'मला हलकासा ताप/खोकला जाणवत असल्याने मी व माझ्या कुटुंबीयांनी कोरोना चाचणी केलेली. मी व माझा मुलगा परिक्षीत आम्हा दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने आम्ही वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत' असं पवार यांनी सांगितलं आहे.

तसंच, ' लातूरमधील आरोग्य व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच लातूर येथेच पुढील उपचार घेण्याचा मी निर्णय घेतला आहे.' असंही पवार यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर, 'आम्हा दोघांचीही तब्येत उत्तम असून काळजीचे काहीही कारण नाही. एक नम्र विनंती आहे, मागच्या 4-5 दिवसांत माझ्या वा परिक्षीतच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःला होम क्वारंटाइन करून घ्यावे आणि खबरदारी म्हणून कोरोना चाचणीही करून घ्यावी' अशी विनंतीही पवार यांनी केली.

औरंगाबादेत शिवसेनेला दुसरा दुख:द धक्का, आणखी एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

अभिमन्यु पवार हे लातूर जिल्ह्यातील औसा मतदार संघाचे भाजपचे आमदार आहे.  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांची काम पाहिले होते.

लोकप्रतिनिधींना लागण

दरम्यान, लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होण्याची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  राजकीय नेत्यांमध्ये राज्यात सर्वप्रथम राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली. काही दिवसांच्या उपचारानंतर जितेंद्र आव्हाड या संकटातून सुखरूप बाहेर पडले. त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. अशोक चव्हाण हे उपचारासाठी नांदेडहून मुंबईत दाखल झाले. यशस्वी उपचारानंतर तेही पुन्हा सुखरूप घरी परतले.

ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का? सेनेचा फडणवीसांना सणसणीत टोला

त्यानंतर कोणतीही लक्षणं न दिसणाऱ्या धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची बाधा झाली. सुदैवाने मुंबईतील एका रुग्णालयातील 11 दिवसांच्या उपचारानंतर धनंजय मुंडे यांनीही कोरोनावर मात केली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह कुटुंबातील 8 सदस्यांनाही लागण झाली आहे. पुण्यात उपमहापौर, खासदार आणि आमदारांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

Published by: sachin Salve
First published: July 8, 2020, 12:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading