शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल, कलम 370वरून म्हणाले...

शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल, कलम 370वरून म्हणाले...

महत्वाच्या मुद्यांवरुन लोकांचे प्रश्न इतर ठिकाणी वेधण्याचा सरकारचा प्रयत्न अर्थव्यवस्थेला घातक असल्याचा इशाराही पवार यांनी दिला आहे.

  • Share this:

जितेंद्र जाधव, प्रतिनिधी

बारामती, 29 ऑक्टोबर : 'सरकारला काहीही विचारलं तरी ते कलम 370 म्हणतात' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'मंदीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो आहे. पण ते सांगतात पुलवामा. ही परिस्थिती दुरुस्त करण्यासाठी काय केलं पाहिजे, ते सांगतीत कलम 370. गुंतवणूक कमी का ते म्हणतात कलम 370 उत्पादन कमी का...ते म्हणतात कलम 370...व्यापारावर परिणाम का झाला....370, कायदा सुव्यवस्था का बिघडली...370' या कलमाबाबत निर्णय घेतला ही गोष्ट योग्य आहे. पण यामुळे अर्थव्यवस्था सुधारेल किंवा त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल हे खर नाही' अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

मंदीच्या संकटाची चाहूल लागू नये यासाठी लोकांचं लक्ष अन्य बाबींकडे वळवण्याचा सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. बारामतीत व्यापारी मेळाव्यात पवार बोलत होते. मंदी दूर केव्हा होणार, अर्थव्यवस्था सुधारणार केव्हा, लोकांच्या नोक-या जाण्याच प्रमाण केव्हा थांबणार या बाबत काहीही विचारले की ते कलम 370 सांगतात. हे योग्य नाही असंही पवार म्हणाले.

इतर बातम्या - #SorrySujith : सुजीतची आयुष्याशी झुंज अपयशी, 3 दिवसानंतर मृतदेह हाती

महत्वाच्या मुद्यांवरुन लोकांचे प्रश्न इतर ठिकाणी वेधण्याचा सरकारचा प्रयत्न अर्थव्यवस्थेला घातक असल्याचा इशाराही पवार यांनी दिला आहे. येत्या 6 डिसेंबर रोजी रामजन्मभूमीबाबत कोर्टाचा निर्णय य़ेणार आहे. त्यावरुनही लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता पवार यांनी बोलून दाखविली.

'रामजन्मभूमीबाबत 6 नोव्हेंबरला न्यायालयाचा निर्णय लागण्याची शक्यता आहे. राममंदीराच्या बाजूने निकाल लागला तर सर्वच हिंदू लोकांना आनंद होईल, अशा वेळेस सरकार म्हणून असा निर्णय जर लागला तर सरकारने मशीद उभारण्यासाठी जवळ वेगळी जागा उपलब्ध करुन द्यायला हवी. यामुळे मुस्लिम धर्मियांचेही समाधान होईल. न्यायालयाच्या निर्णयानुसार सामंजस्याने याच्यात दोन्ही पक्षांनी मार्ग काढावा. सामंजस्याने हा प्रश्न सोडवल्याचे समाधान देशवासियांनाही मिळेल' असं पवार म्हणाले.

इतर बातम्या- दिवाळी, पाऊस ते राजकारण; थोडक्यात वाचा आजच्या 8 महत्त्वाच्या बातम्या

First published: October 29, 2019, 8:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading