Home /News /news /

शेजाऱ्यांचा जावई दिल्लीवरून आला म्हणून खेळला खूनी खेळ, जागीच झाला दोघांचा मृत्यू

शेजाऱ्यांचा जावई दिल्लीवरून आला म्हणून खेळला खूनी खेळ, जागीच झाला दोघांचा मृत्यू

या भांडणामध्ये महिलेसह एकाचा मृत्यू झाला तर तीन लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

    भिंड (मध्य प्रदेश), 16 मे : देशात कोरोनाचा कहर सुरूच असताना स्क्रिनिंग करण्यावरून दोन गटांमध्ये खूनी खेळ झाल्याचं समोर आलं आहे. दोन्ही पक्षांमध्ये स्क्रिनिंगवरून वाद झाला. या भांडणामध्ये महिलेसह एकाचा मृत्यू झाला तर तीन लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून, एका जखमीची प्रकृती चिंताजनक झाल्यानं त्यांना ग्वाल्हेर इथं उपचारासाठी पाठवण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यूही झाला. पोलिसांनी 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेशातील भिंड शहरातील प्रेमनगर भागात ही खळबळजनक घटना घडली आहे. सिटी कोतवाली परिसरातील प्रेमनगर येथील रहिवासी असलेल्या कपूरे खान यांच्या घरी दिल्लीहून त्यांचा जावई आला होता. शुक्रवारी रात्री जावई घराबाहेर बसला होता. तेवढ्यात, जावईला बाहेर बसलेला पाहून शेजारच्या रहिवासी कला जाटव नावाच्या महिलेनं त्याच्या बाहेर बसण्यावरून आक्षेप घेतला. त्यांनी जावईची तपासणी करण्यास सांगितलं. या प्रकरणावरून दोन्ही घरांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की दोन्ही गटांमध्ये भयंकर भांडणं आणि दगडफेक सुरू होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन LIVE : चौथ्या दिवशी 'या' क्षेत्रांना मिळणार दिलासा या दगडफेकीत काला जाटव मरण पावल्या, तर कला यांच्या कुटुंबातील अन्य दोन लोकही गंभीर जखमी झाले. दुसरीकडे कपूरे खान यांच्या कुटुंबातील एक व्यक्तीही जखमी झाला. त्यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. ही बातमी समजताच सिटी कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच वेळी, जखमीची गंभीर स्थिती पाहता, त्यांना ग्वाल्हेर इथे दाखल करण्यात आलं. अमेरिकेतील कंपनीचा दावा - 'कोरोनावर शोधलं वॅक्सिन, 100 टक्के काम करणार हे औषध' शुक्रवारी रात्री कला जाटवचा मृत्यू झाला, त्याचवेळी काल जाटवचा भाऊ विष्णू जाटव यांचा आज ग्वाल्हेर इथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी हत्येप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 9 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस एफआयआर नोंदवून आरोपीचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपींना अटक केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. स्वस्त घर खरेदीसाठी मोदी सरकारच्या या योजनेचा घेऊ शकाल फायदा, वाचा सविस्तर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या