• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • अमेरिकेतील कंपनीचा दावा - 'कोरोनावर शोधलं वॅक्सिन, 100 टक्के काम करणार हे औषध'

अमेरिकेतील कंपनीचा दावा - 'कोरोनावर शोधलं वॅक्सिन, 100 टक्के काम करणार हे औषध'

भारत बायोटेक (Bharat Biotech) ची Covaxin आणि झाइडस कॅडिलाची ZyCoVD च्या दोन कंपन्या आणि सिरमचं काम प्रगती पथावर आहेत.

भारत बायोटेक (Bharat Biotech) ची Covaxin आणि झाइडस कॅडिलाची ZyCoVD च्या दोन कंपन्या आणि सिरमचं काम प्रगती पथावर आहेत.

सर्व देश कोरोनावर वॅक्सिन बनवण्यासाठी कामाला लागले आहेत. अशात अमेरिकेच्या एका कंपनीने असा दावा केला आहे की, त्यांनी कोरोना विषाणूवर वॅक्सिन शोधून काढलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 16 मे : संपूर्ण जगभर कोरोनामुळे हाहाकार माजला असताना सर्व देश कोरोनावर वॅक्सिन बनवण्यासाठी कामाला लागले आहेत. अशात अमेरिकेच्या एका कंपनीने असा दावा केला आहे की, त्यांनी कोरोना विषाणूवर वॅक्सिन शोधून काढलं आहे. फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, कॅलिफोर्नियास्थित बायोटेक कंपनी सोरेंटो थेरपीटिक्सने (Sorrento Therapeutics )असं म्हटलं आहे की त्यांनी एसटीआय -1499 (STI-1499 )नावाची एँटीबॉडी तयारी केली आहे. कंपनीनं असं म्हटलं आहे की, पेट्री डिश प्रयोगात असं आढळलं की, STI-1499 अँटीबॉडी कोरोना विषाणूला मानवी पेशींमध्ये संसर्ग पसरवण्यास 100 टक्के प्रतिबंध करते. यामुळे शरीरात कोरोनाचा फैलाव होत नाही. सोरेन्टो कंपनी अनेक अँटीबॉडीज तयार करण्यासाठी न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये काम करत आहे. अनेक अँटीबॉडीज मिसळून 'औषधांचं कॉकटेल' तयार करण्याची ही योजना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. डेली मेलच्या अहवालानुसार, सोरेन्टो कंपनीनं एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, ते एका महिन्यात अँटीबॉडीचे 2 लाख डोस तयार करू शकतात. STI-1499 अँटीबॉडी वापरण्याच्या मंजुरीसाठी कंपनीने अमेरिकेच्या फूड अ‍ॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) कडे अर्ज पाठवला आहे. कंपनीनं आपत्कालीन तत्वावर मान्यता मागितली आहे. या बातमीनंतर कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 220 टक्क्यांची वाढ झाली आहे. सोरेन्टोचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेनरी जी यांनी फॉक्स न्यूजला सांगितलं, 'या आजारावर उपया आहे. आम्ही शोधून काढलेलं वॅक्सिन 100 टक्के प्रभावी आहे.' मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेनरी म्हणाले की, जर या औषधांमुळे व्हायरस फैलाव झाला नाही आणि त्याचा शरीरावर कोणताही साईड इफेक्ट झाला नाही तर सोशल डिस्टंसिंगसारख्या नियमांचं पालन करण्याची गरज नाही. त्यानंतर लॉकडाऊन उघडलं जाऊ शकतं. खरंतर, प्रयोगशाळेतील मानवी पेशींवर या अँटीबॉडीची चाचणी घेण्यात आली आहे. मानवांवर त्याची प्रत्यक्ष चाचणी झालेली नाही. अँटीबॉडीजचे दुष्परिणाम देखील सध्या माहित नाही आणि मानवी शरीरावर त्याचा काय परिणाम होईल याचीही अद्याप चाचणी करणार असल्याचं या कंपनीने म्हटलं आहे.
  Published by:Manoj Khandekar
  First published: