नवी दिल्ली, 19 एप्रिल : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानुसार दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनच्या घोषणेनंतर दिल्लीत दारुच्या दुकानांसमोर रांगा लागल्याचं चित्र पुन्हा पाहायला मिळत आहे. अनेक महिलाही रांगेत असून एका महिलेच्या दारुबद्दलच्या तर्काचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल व्हायला सुरुवात झाली आहे.
(वाचा-'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर)
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत 19 एप्रिलला रात्री 10 वाजेपासून ते पुढच्या सोमवारपर्यंत सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळं सोमवारी सकाळपासूनच दिल्लीत विविध ठिकाणी खरेदीसाठी लोकांची गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र सर्वाधिक गर्दी ही दिल्लीत दारुच्या दुकानांसमोर होत आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही हे चित्र पाहायला मिळत आहे. दारु खरेदीसाठी लोकांची झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे.
(वाचा-‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा)
महिलेचा अजब तर्क...
दारु खरेदी करण्यासाठी दिल्लीच्या एका दुकानावर आलेल्या महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरकारनं दारुचे ठेके सुरू ठेवायला हवे अशी मागणी ही महिला करत आहे. विशेष म्हणजे ही महिला स्वत:साठी दारु खरेदी करायला आल्याचं पाहायला मिळालं. आम्हाला इंजेक्शनने फायदा होणार नाही तर उलट अल्कोहोलनं फायदा होईल असं ही महिला म्हणत असल्याचं दिसून येत आहे. मला औषधांनी नव्हे तर दारुच्या पेगनं फायदा होईल असंही ही महिला म्हणताना दिसत आहे.
#WATCH Delhi: A woman, who has come to purchase liquor, at a shop in Shivpuri Geeta Colony, says, "...Injection fayda nahi karega, ye alcohol fayda karegi...Mujhe dawaion se asar nahi hoga, peg se asar hoga..." pic.twitter.com/iat5N9vdFZ
— ANI (@ANI) April 19, 2021
या महिलेचा तर्क काहीसा मजेशीर वाटत असला तरी दिल्लीत दारुचा विषय चांगलाच गंभीर असल्याचं दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे गेल्या वेळीदेखिल दिल्लीत लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही दारुच्या दुकानांसमोर गर्दी झाल्याचं पाहायला मिळाली होतं. यावेळीही तेच चित्र असून सोशल डिस्टन्सिंग किंवा कोरोनाच्या इतर नियमांना धाब्यावर बसवून लोक गर्दी करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळं लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीची ही गर्दीच कोरोनाच्या संसर्गाचं कारण ठरू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Delhi, Injection, Lockdown, Vaccine