मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

काँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली, मनमोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर

काँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली, मनमोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर

मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहिलं होतं. आता केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी या पत्राला उत्तर देत काँग्रेसच्या इतर नेत्यांवर निशाणा साधला आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 19 एप्रिल : देशात कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रसार रोखण्यासाठीच्या पद्धतींचा उल्लेख असणारं एक पत्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) लिहिलं होतं. आता केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी या पत्राला उत्तर देत काँग्रेसच्या इतर नेत्यांवर निशाणा साधला आहे. हर्षवर्धन यांनी पत्रात लिहिलं, की लसीकरणाचं महत्त्व तुम्हाला समजतं, मात्र कदाचित तुमच्याच पक्षाचे इतर नेते तुमच्या या मताशी सहमत नाहीत.

डॉक्टर हर्षवर्धन पुढे म्हणाले, की ही अत्यंत दुःखद बाब आहे, की मनमोहन सिंग यांना लसीकरणाचं महत्त्व समजत आहे, मात्र त्यांच्याच पक्षाच्या जबाबदार पदांवर असणाऱ्या आणि काँग्रेसचं सरकार असणाऱ्या राज्यांमधील नेते तुमच्या या मताशी सहमत नाहीत. ही गोष्ट हैराण करणारी आहे, की काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शास्त्रज्ञ आणि लसीची निर्मिती करणाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी एक शब्दही बोलला नाही. भारतात दोन लसींची निर्मिती होणं, ही देशासाठी अभिमानाची बाब नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे.

त्यांनी पुढे लिहिलं, की अनेक काँग्रेस सदस्य लसीच्या परिणामाबाबत अफवा पसरवत लोकांच्या जीवनासोबत खेळ करत राहिले. काहींनी तर सार्वजनिक ठिकाणी लसीला वाईट म्हटलं मात्र नंतर स्वतःच जाऊन लस घेतली.

मनमोहन सिंग यांचं पंतप्रधान मोदींना पत्र, Corona विरुद्ध लढण्यासाठी दिले 5 मंत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं की, लस निर्माता कंपन्यांपैकी कोणत्या कंपनीला सरकारने पुढील सहा महिन्यांसाठी आणि किती डोसची ऑर्डर दिली आहे हे सरकारने जाहीर करावे. जर आपण या 6 महिन्यांच्या काळात निश्चित करण्यात आलेल्या नागरिकांचे लसीकरण केले तर आपल्याला आणखी डोसची ऑर्डर देणे आवश्यक आहे. जेणेकरुन लसींचे डोस आपल्याकडे उपलब्ध असतील. मनमोहन सिंग यांनी सुचवले की, कोरोनाच्या या लसींच्या डोसचे वितरण हे पारदर्शक पद्धतीने झाले पाहिजे. आपण किती नागरिकांचे लसीकरण केले आहे हे पाहण्याऐवजी आपल्या लोकसंख्येपैकी किती टक्के लोकांचं लसीकरण केलं याकडे लक्ष दिले पाहिजे. यासोबतच लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना मदत आणि राज्यांना मदत देण्यासंदर्भातही त्यांनी या पत्रात लिहिलं होतं.

First published:

Tags: Corona, Health, Manmohan singh, Narendra modi, Pandemic