Home /News /news /

…आणि त्या माऊलीला ‘News18 लोकमत’च्या वृत्तानं परत मिळालं गहाण ठेवलेलं मंगळसूत्र!

…आणि त्या माऊलीला ‘News18 लोकमत’च्या वृत्तानं परत मिळालं गहाण ठेवलेलं मंगळसूत्र!

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील बीडमधील सीताबाई यांच्या परिस्थितीची दखल घेतली आहे.

बीड, 6 मे: लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात धुणीभांडी करून घर चालवणाऱ्या बीड शहरातील सीताबाई टाक यांच्यावर किराणा आणि पतीच्या औषधीसाठी मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ होती. हे भयाण वास्तव 'News18 लोकमत'ने समाजासमोर आणलं होतं. या वृत्ताची दखल घेऊन सीताबाईंच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत. 24 तासांच्या आत त्यांना त्यांचं मंगळसूत्र परत मिळालं. एवढंच नाही तर या वृत्ताची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील दखल घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनीही या कुटूंबाला मदत करण्याचे आदेश शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना दिले आहेत. हेही वाचा.. विविध जिल्ह्यात अडकलेले नागरिक कसे पोहोचणार घरी? सरकारनं घेतला मोठा निर्णय सामाजिक कार्यकर्त्यांनी पाच हजार रुपये देऊन सीताबाईंचं मंगळसूत्र सोडवून त्यांना ते परत दिलं. एवढंच नाही तर सीताबाई यांना किराणाही भरुण दिला. यावेळी सीताबाईच्या डोळ्यात पाणी तराळलं होतं. मात्र, ही एकट्या सीताबाई टाकची अशी परिस्थिती नाही. तर लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणाऱ्या हजारो मजूर कामगारांना भाकरीचा संघर्ष करावा लागत आहे. त्यांच्यापर्यंत मदत पोहोवण्यात प्रशासन कमी पडत आहे. समाजातील दानशुरानी देखील गरजूंना अशा प्रकारे मदत करत आहेत. बीड शहरात माळीवेश भागात राहणारे 60 वर्षीय काशिनाथ टाक व पत्नी सीताबाई टाक यांच्या परिस्थितीबाबत सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण यांना समजली. त्यांनी सीताबाई यांचं मंगळसूत्र सोडवण्यासाठी लागणारे पाच हजार रुपये दिले. एवढेच नाही तर सीताबाई यांना किराणा भरुण दिला. मंगळसूत्र सोडवून आणल्यानंतर सीतावाई यांना अश्रू आवरता आले नाही. हेही वाचा.. नागपुरात संघर्ष थांबेना, सत्ताधाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढेंनाच दिला असा दणका! आदित्य ठाकरेंनाही घेतली दखल.. युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील बीडमधील सीताबाई यांच्या परिस्थितीची दखल घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेचे पदाधिकारी विपुल पिंगळे यांना फोन करून सीताबाई यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तजवीज केली आहे. उघड्यावर आलेल्या सीताबाई टाक यांच्या कुटुंबाला आता आधार मिळाला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या