• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • COVID-19चा धोका वाढल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा Lockdown, अशी होणार अंमलबजावणी

COVID-19चा धोका वाढल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा Lockdown, अशी होणार अंमलबजावणी

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाव्हायरसचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे नव्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे शहरात आता पुन्हा लॉकडाउन करण्यात येणार आहे.

  • Share this:
पिंपरी-चिंचवड 3 जुलै: पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाव्हायरसचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे नव्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे शहरात आता पुन्हा लॉकडाउन करण्यात येणार आहे. गर्दी कमी करण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याचं शहराच्या महापौर माई ढोरे यांनी सांगितलं. अशाच प्रकारे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातल्या अनेक भागांमध्येही पुन्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापौर म्हणाल्या, शहर पूर्णकाळ लॉकडाउन करता येणार नाही, मात्र आठवड्यातील गुरुवार आणि रविवारी त्याची अंमलबजावणी अधिक कडकपणे करण्यात येणार आहे. दरम्यान, शहरात अशी परिस्थिती असतानाच आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला आहे. त्यामुळे रुगणांचे मोठे हाल होत आहेत. अचानक कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिल्यामुळे सकाळपासून व्यवस्थापनाची धावपळ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमचा विमा उतरवा आणि सुरक्षेची साधनं पुरावा या मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याची माहिती समोर येत आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे दवाखान्याच्या संचालिका रेखा दुबे असं काही झालच नसल्याचा दावा करत होत्या. त्या म्हणाल्या की, 'हा सगळा प्रकार रात्री घडला. तोपर्यंत सगळेजणं काम करत होते. कर्मचाऱ्यांच्या या निर्णयामुळे मला मोठा धक्क बसला आहे.' ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ पुण्यातही लॉकडाऊन? आयुक्तांनी केला खुलासा 'कोणतीही आरोग्यसेवा अशी कामे कशी करू शकते का? डॉक्टर आणि नर्स त्यांच्या सेवेसाठी वचनबद्ध आहेत. या संकट काळात प्रत्येक आरोग्यसेवा कर्मचारी आपल्या गरजू रूग्णांची सेवा करण्यासाठी झटत आहे. या परिस्थितीत कोणीही अमानुषपणे वागू शकत नाही.' अशी प्रतिक्रिया दुबे यांनी माध्यमांना दिली आहे. भारतीयांनी करून दाखवलं! वाचा कशी तयार झाली Made in India कोरोना वॅक्सीन दरम्यान, पुण्यात Covid-19 चा उद्रेक होण्याची शक्यता आहे, कारण पुण्यात चाचण्यांचं प्रमाण वाढवलं आहे. असं पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केलं. उलट लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांनी विनाकारण बेड्स अडवून ठेवू नयेत, असंही आवाहन पालिका आयुक्तांनी केलं आहे. संपादन - अजय कौटिकवार  
First published: