जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / BMC ने सील केली गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची इमारत, नेमकं काय झालं?

BMC ने सील केली गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची इमारत, नेमकं काय झालं?

BMC ने सील केली गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची इमारत, नेमकं काय झालं?

प्रभूकुंज सील केल्यानंतर इमातर सील का केली गेली. काही धोका आहे का असे संध्याकाळपासूनच नातेवाईकांचे फोन सुरू झाले असं कुटुंबियांकडून सांगण्यात आलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 ऑगस्ट : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रभूकुंज या इमारतीला बृहन्मुंबई महानगरपालिकेने सील केलं असल्याची माहिती समोर येत आहे. कोविड -19 साथीच्या धोका टाळण्यासाठी सावधगिरी म्हणून शनिवारी लता मंगेशकर यांची इमारत सील करण्यात आली. लता मंगेशकर आणि त्यांचे कुटुंबिय सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरंतर, 90 वर्षीय लता मंगेशकर यांनी याबाबत एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं होतं. लता मंगेशकर यांचे घर दक्षिण मुंबईतील चांबाला हिल भागात आहे. इमारतीमध्ये अनेक वृद्ध मंडळी आहेत. त्यामुळे पालिकेने ही इमारत सील करावी असं पत्रच लता मंगेशकर यांनी सादर केलं होतं. इतकंच नाही तर प्रभूकुंज सील केल्यानंतर इमातर सील का केली गेली. काही धोका आहे का असे संध्याकाळपासूनच नातेवाईकांचे फोन सुरू झाले असं कुटुंबियांकडून सांगण्यात आलं. त्यानंतर लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांनी अधिकृत निवेदनाद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. 6 महिन्यांत सगळं काही बदललं, ही लक्षणं असतील तर तुम्हीही असू शकता कोरोना पॉझिटिव्ह आमच्या घर आणि इमारतीमध्ये ज्येष्ठ नागरिक असल्याने सावधगिरी म्हणून महापालिकेने इमारत सील केली आहे. यावेळी आपल्याला अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. विशेषत: या वेळी घरांमध्ये गणेशोत्सव साध्या पद्धतीने आणि सामाजिक अंतरावरुन साजरा करा अशी माहिती त्यांनी पत्राद्वारे लिहिली आहे. चालकाचा डोळा लागला अन् गाडी पुलावरून नदीत कोसळली, अपघातानंतरचा भयंकर VIDEO समोर पुढे अधिकृत निवेदनात त्यांनी असं लिहिलं आहे की, ‘कृपया आमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका. अफवा पसरवू नका. आपण एकमेकांची चांगली काळजी घेतली पाहिजे आणि समाजात ऐक्य निर्माण करून सुरक्षितता बाळगली पाहिजे. खासकरून सर्व ज्येष्ठ नागरिकांची आणि इतरांची काळजी घ्या. देवाची कृपा आणि अनेकांच्या शुभेच्छांमुळे आमचे कुटुंब सुरक्षित आहे.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात