जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / चालकाचा डोळा लागला अन् गाडी पुलावरून नदीत कोसळली, अपघातानंतरचा भयंकर VIDEO समोर

चालकाचा डोळा लागला अन् गाडी पुलावरून नदीत कोसळली, अपघातानंतरचा भयंकर VIDEO समोर

चालकाचा डोळा लागला अन् गाडी पुलावरून नदीत कोसळली, अपघातानंतरचा भयंकर VIDEO समोर

सदर वाहन नेमकं कोणतं होतं हे अद्याप समजू शकलं नसलं तरी लक्झरी बस नदीत पडल्याची भिती व्यक्त केली जात आहे़.

  • -MIN READ
  • Last Updated :

धुळे, 28 ऑगस्ट : धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील सावळदे तापी नदीच्या पुलावरून भरधाव वेगाने येणारे अज्ञात वाहन तापी नदीत पडल्याची दुर्दैवी घटना पुन्हा घडली़ आहे. ही घटना घडल्यानंतर याचा धक्कादायक व्हिडिओदेखील समोर आला आहे. सदर वाहन नेमकं कोणतं होतं हे अद्याप समजू शकलं नसलं तरी लक्झरी बस नदीत पडल्याची भिती व्यक्त केली जात आहे़. आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास हे वाहन धुळ्याकडून येत असताना सदर वाहन चालकाला डुलकी लागल्यामुळे तापी पुलाचे कठडे तोडून पाण्यात पडल्याचं बोललं जातं आहे. सदरची घटना महामार्ग पोलिसांना कळताच ते लागलीच घटनास्थळी दाखल झाले आहे़त. मात्र, तापी नदी दुथडी भरून वाहत असल्याने नेमका अंदाज येत नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे. अशात पोलिसांनी शोध कार्य सुरू केलं असून पुलाचे कठडे मोठ्या प्रमाणावर तुटल्यामुळे एखादं मोठं वाहन पाण्यात पडलं असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीने एक बटाटे भरलेला ट्रक नदीपात्रात जाऊन कोसळला होता. तो अद्याप बाहेर काढण्यात आलेला नाही. त्यात एकाचा मृत्यूही झाला होता.

जाहिरात

त्यामुळे आता झालेल्या या अपघातामध्ये मोठी भीती व्यक्त केली जात आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे सगळी धरणं आणि नदीपात्रं ही दुथडी भरून वाहत आहेत. अशात पावसाच्या पाण्यामुळे पूलदेखील जीर्ण झाले आहेत. त्यामुळे अशा घटना वारंवार समोर येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात