30 वर्ष 3 जागांवर केली सरकारी नोकरी, अखेर 'आधार'नं केली इंजिनिअरची पोलखोल

30 वर्ष 3 जागांवर केली सरकारी नोकरी, अखेर 'आधार'नं केली इंजिनिअरची पोलखोल

आरोपी इंजिनिअर सुरेश राम यांनी 30 वर्षांची सरकारी नोकरी केली आहे आणि त्यातून चांगला पगार घेतला आहे. त्याहूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तिन्ही पोस्टवर त्याला वेळोवेळी पदोन्नती मिळत राहिली.

  • Share this:

बिहार, 24 ऑगस्ट : सरकारी नोकरी मिळण्यासाठी खरंतर सगळ्यांची धडपड सुरू असते. पण अशा एका नटवरलालचा पर्दाफाश झाला आहे जो एका नाही तर 3 ठिकाणी सरकारी नोकरी करत होता. इतकंच नाही तर तीनही विभागांकडून भरभक्कम पगारही मिळत होता. त्याच्या या बनावाची कोणाला कानोकान खबर नव्हती. त्यामुळे गेली अनेक वर्ष त्याने अशा पद्धतीने पैसे कमावले. सगळ्यात धक्कादायक म्हणजे हा व्यक्ती इंजिनिअर पदवीधर आहे.

आरोपी इंजिनिअर सुरेश राम यांनी 30 वर्षांची सरकारी नोकरी केली आहे आणि त्यातून चांगला पगार घेतला आहे. त्याहूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तिन्ही पोस्टवर त्याला वेळोवेळी पदोन्नती मिळत राहिली. त्याने तिन्ही सरकारी नोकऱ्यांवर कामं केली. पण त्याचा हा प्लान फार काळ लपला नाही आणि त्यांचा पर्दाफाश झाला.

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार आरोपी सुरेश राम हा पाटणा जिल्ह्यातील बभौल गावचा रहिवासी आहे. कॉम्प्रिहेंसिव्ह फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम (CFMS)ने इंजिनिअरचा फसवा कारभार उघडकीस आणला आहे.  खरंतर, CFMSमध्ये बिहारच्या प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यायाला त्याचा आधार, जन्म तारीख आणि पॅनकार्ड तपशील भरावा लागतो. आरोपी सुरेश राम यांनी त्यांचा तपशील भरला असता त्याची खोटी माहिती उघडकीस आली.

तीन सरकारी विभागाकडून मिळत होता पगार

CFMS यंत्रणेतील वेतन प्रक्रियेत सुरेश राम नावाच्या तीन व्यक्तींना सहाय्यक इंजिनिअर म्हणून काम करताना पाहण्यात आलं. एक नोकरी सुरेश राम जलसंपदा विभाग बांका इथे सहाय्यक इंजिनिअर, दुसरी नोकरी सुपौल जिल्ह्यात सुरेश राम सहायक इंजिनिअर आणि तिसरी नोकरी सुरेश राम किशनगंज इमारत विभागात सहाय्यक इंजिनिअर पदावर कार्यरत असल्याचं आढळून आलं.

महत्त्वाची बातमी - सेना-भाजपच्या युतीचे थर कोसळणार, चंद्रकांत पाटलांनी दिले संकेत

फसवा कारभार समोर येताच इंजिनिअर फरार

विशेष म्हणजे तीनही ठिकाणी सुरेश राम यांचं नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव, रँक, उंची, शरीराची ओळख, पत्ता सारखा आढळला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सरकारी उपसचिव चंद्रशेखर प्रसाद सिंह यांनी सुरेश राम यांना सर्व प्रमाणपत्रे सादर करून 22 जुलै रोजी पाटणा मुख्यालयात सादर करण्यास सांगितलं. यानंतर सुरेश राम तिथं आला पण तो महत्त्वाची प्रमाणपत्र राहिली असं सांगून तो फरार झाला.

या प्रकरणात सुरेशचा साथीदार मधुसुदन कुमार कर्ण याच्या तक्रारीच्या आधारे गेल्या आठवड्यात किशनगंज पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आली होती. कर्ण इमारत बांधकाम विभागात कार्यकारी इंजिनिअर आहेत.

इतर बातम्या - BREAKING: दहीहंडी उत्सवाला गालबोट, पाचव्या थरावरून कोसळून गोविंदाचा मृत्यू

निवृत्त होणार होता इंजिनिअर

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश राम काही वर्षांनी निवृत्त होणार होता. परंतु, एफआयआर दाखल झाल्यापासून तो फरार आहे. एफआयआरनुसार सहाय्यक इंजिनिअर सुरेश राम याची 20 जानेवारी 1988 रोजी पाटणा येथे राज्य रस्ते बांधकाम विभागात नियुक्ती करण्यात आली होती.

इतर बातम्या - खुनाच्या आरोपाखाली तारुण्य गेलं तुरुंगात, 21 वर्षांनी कोर्टानं ठरवलं निर्दोष

त्यानंतरच्या २8 जुलै 1989 रोजी त्याला जलसंपदा विभागात नोकरी मिळाली. त्याच वर्षी जलसंपदा विभागात सुरेश राम याने आणखी एक नोकरी मिळवली. ते सुपौल जिल्ह्यात तैनात होते. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरेश हे तीन ठिकाणी सरकारी नोकरी करत होते. ते आता एकापाठोपाठ सगळ्या पदावरून निवृत्त झाले असते.

पुण्यातील दारूड्या महिलेचा आणखी एक VIDEO समोर, जवानांना केली शिवीगाळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bihar News
First Published: Aug 24, 2019 10:11 PM IST

ताज्या बातम्या