मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सलग चौथ्यांदा आमदार झाल्यानंतरही या नेत्याकडे नाही पक्क घर, आजही हाकतात नांगर

सलग चौथ्यांदा आमदार झाल्यानंतरही या नेत्याकडे नाही पक्क घर, आजही हाकतात नांगर

सरपंच झाल्यानंतर अवघ्या वर्षभरात अक्षरश: पायी चालणारा व्यक्ती आलिशान कारमधून फिरतो. एवढंच नाही तर टूमदार बंगल्यात राहातो.

सरपंच झाल्यानंतर अवघ्या वर्षभरात अक्षरश: पायी चालणारा व्यक्ती आलिशान कारमधून फिरतो. एवढंच नाही तर टूमदार बंगल्यात राहातो.

सरपंच झाल्यानंतर अवघ्या वर्षभरात अक्षरश: पायी चालणारा व्यक्ती आलिशान कारमधून फिरतो. एवढंच नाही तर टूमदार बंगल्यात राहातो.

  • Published by:  Sandip Parolekar
कटिहार, 14 नोव्हेंबर: भारत (India) देशात एखादा व्यक्ती गावाचा सरपंच झाल्यानंतर तर त्याचा थाट पाहायलाच नको. सरपंच झाल्यानंतर अवघ्या वर्षभरात अक्षरश: पायी चालणारा व्यक्ती आलिशान कारमधून फिरतो. एवढंच नाही तर टूमदार बंगल्यात राहातो. पाच वर्षांच्या कार्यकाळात तर गावाचा प्रमुख झालेला व्यक्तीत लाखों रुपयांची मायाही जमा करून घेत असतो. मात्र, बिहारमधील एक आमदार याला अपवाद ठरले आहेत. एकदा नाही तर चौथ्यांदा आमदार झालेला हा नेत्याकडे पक्क घर नाही. आजही ते शेतात नांगर हाकतात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. हेही वाचा..दिवाळीच्या दिवशी मोदींनी दिला चीन आणि पाकला थेट इशारा महबूब आलम ( MLA Mehboob Alam)असं या आमदाराचं नाव आहे. बिहरमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Bihar Election 2020) महबूब आलम हे बलरामपूर मतदार संघातून सलग चौथ्यांदा जिंकले झाले आहेत. आपल्या प्रामाणिक स्वभावामुळे आमदार महबूब आलम ओळखले जातात. कदाचित याच कारणामुळे आमदार महबूब आलम यांना स्वत:च्या कुटुंबासाठी पक्क घर बांधता आलं नसावं. आमदार महबूब आलम हे बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील रहिवासी आहेत. महबूब आलम हे बलरामपूर विधानसभेचे चौथ्यांदा आमदार झाले आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत तर महबूब आलम हे मोठ्या मताधिक्क्यानं निवडून आले आहेत. परंतु, चौथ्यांदा निवडणून आल्यानंतरही आमदार आलम हे स्वत: साठी एकही पक्क घर बांधू शकले नाही. आजही ते पायी फिरतात. शेती करतात. दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत जिंकून विधानसभे पोहोचलेले 81 टक्के आमदार कोट्याधीश आहेत. त्यात आमदार महबूब आलम हे एकटे आमदार असे आहेत की त्यांच्याकडे पक्क घर नाही. सध्या महबूब आलम यांची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. हेही वाचा...इमानदार ड्रायव्हर! चालकानं परत दिले टॅक्सीत राहिलेले 8 लाखांचे दागिने कम्युनिस्ट पक्षाच्या तिकीटावर चौथ्यांदा आमदार.. महबूब आलम हे कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (CPI)तिकिटावर चौथ्यांदा आमदार झाले आहेत. ते कटिहार जिल्ह्यातील बलरामपूरचे आमदार आहेत. 53 हजारांहून जास्त मताधिक्क्यानं महबूब आलम यांनी विजय मिळवला आहे. बिहार निवडणुकीतील हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. आमदार महबूब आलम हे 44 वर्षांचे असून ते 10 वी उत्तीर्ण आहेत. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे.
First published:

Tags: Bihar, Bihar Election

पुढील बातम्या