जाहिरात
मराठी बातम्या / देश / इमानदार ड्रायव्हर! चालकानं परत दिले टॅक्सीत राहिलेले 8 लाखांचे दागिने

इमानदार ड्रायव्हर! चालकानं परत दिले टॅक्सीत राहिलेले 8 लाखांचे दागिने

इमानदार ड्रायव्हर! चालकानं परत दिले टॅक्सीत राहिलेले 8 लाखांचे दागिने

पोलीस कर्मचारी आणि अब्दुल खालिद यांनी कल्याण सर्कल पोलीस चौकी गाठून या प्रकरणाची माहिती दिली.

  • -MIN READ
  • Last Updated :

सीकर, 14 नोव्हेंबर : सच्चा आणि इमानदार लोक फार कमी भेटतात आणि त्यांच्या सच्चेपणामुळे आजही माणुसकी टिकून आहे असं म्हणायला हवं. खोट्या आणि फसव्या युगातही प्रामाणिकपणा जिवंत आहे. राजस्थानातील सीकर जिल्ह्यात याचे एक जिवंत उदाहरण समोर आलं आहे. एका टॅक्सी चालकानं महिला प्रवाशांचे तब्बल 8 लाख रुपयांचे दागिने प्रामाणिकपणे परत केले आहेत. महिला हे दागिने टॅक्सीमध्येच विसरली होती. चालकानं प्रामाणिकपणा दाखवून ती परत केली. त्याबद्दल महिलेनं चालकाचे खूप आभार देखील मानले. या टॅक्सी चालकाच्या प्रामाणिकपणाचे सीकर जिल्ह्यात तुफान कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागौरच्या जयल येथील पटवारीच्या पोस्टवर तैनात पिपरळी येथे राहणारी इंदिरा जट गुरुवारी सायंकाळी आपल्या घरी परत आल्या. त्याने घरी जाण्यासाठी शहरातील बजरंग काटा येथून टॅक्सी पकडली होती. यावेळी दागिन्यांनी भरलेली बॅग गाडीतच विसरून ही महिला घरी जात होती. त्याचवेळी चालकाला ही बॅग दिसली. टॅक्सी चालक अब्दुल खालिद यांनी प्रामाणिकपणा दाखवून ही बॅग जवऴ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला दिली. हे वाचा- या देशात Political Islam वर पूर्णपणे बंदी; मशिदींबाबतही घेतला मोठा निर्णय पोलीस कर्मचारी आणि अब्दुल खालिद यांनी कल्याण सर्कल पोलीस चौकी गाठून या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी ही बॅग उघडून जेव्हा पाहिले तेव्हा त्यामध्ये एक चिठ्ठी मिळाली ज्यामध्ये मोबाईल नंबर होते. पोलिसांनी मोबाईल नंबर लावून विचारणा केली. सर्व गोष्टी खात्रीशीर वाटल्यानंतर ज्या महिलेची बॅग हरवली होती तिला ही बॅग परत करण्यात आली. या महिलेनं पोलीस आणि टॅक्सी चालकाचे आभार मानले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: rajasthan
  • First Published :
जाहिरात
जाहिरात