दिवाळीच्या दिवशी मोदींनी दिला चीन आणि पाकला थेट इशारा

दिवाळीच्या दिवशी मोदींनी दिला चीन आणि पाकला थेट इशारा

'जगातील कोणतीच ताकद आमच्या सैनिकांना भारताच्या सीमेचं रक्षण करण्यापासून रोखू शकत नाही'

  • Share this:

जैसलमेर, 14 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi )यांनी जैसलमेरमध्ये (jaisalmer)भारतीय जवानांसोबत (Indian army) दिवाळी (Diwali) साजरा करत आहे. 'जगातील कोणतीच ताकद आमच्या सैनिकांना भारताच्या सीमेचं रक्षण करण्यापासून रोखू शकत नाही', असं म्हणत  पंतप्रधान मोदी यांनी भारतीय सैन्यांचं कौतुक करत थेट पाकिस्तान आणि चीनला इशारा दिला आहे.

जैसलमेरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांसोबत दिवाळी साजरा करण्यासाठी पोहोचले आहे. यावेळी त्यांनी जवानांच्या धाडसाचे आणि साहसाचे कौतुक करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.

आज दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक जण आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरा करत आहे. त्यामुळे मी सुद्धा तुमच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलो आहे. तुम्ही बर्फात कर्तव्यावर असाल किंवा वाळवंटामध्ये तैनात असाल, पण तुमच्यामध्ये येऊन आल्यावरच माझी दिवाळी पूर्ण झाली आहे, असं मोदी म्हणाले.

देशातील प्रत्येक नागरिकांची नजर ही तुमच्यावर आहे. सीमेवरील प्रत्येक चौकीपैकी लोगोंवाला चौकीचे नाव हे प्रत्येक भारतीयांना माहिती असेल. ही अशी चौकी आहे जिथे उणे 50 इतके तापमान असते. तरीही अशा प्रतिकुल परिस्थितीत भारतीय जवान आपले कर्तव्य पार पाडत आहे. ज्या वेळी भारतीय सैन्याबद्दल लिहिले जाईल तेव्हा 'बॅटल ऑफ लोगोंवाला' हे कायम स्मरणात राहिल, असंही मोदी म्हणाले.

'पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये लोकांवर अत्याचार होत आहे. महिलांवर तिथे अत्याचार होत आहे. या घटनांमुळे पाकचा खरा चेहरा हा उघड पडला आहे. या घटनांवरून लक्ष्य दूर हटवण्यासाठी पाकने पश्चिम सिमेवर हल्ले सुरू केले आहे. आपल्याही सैनिकांनी पाकला जशास तसे उत्तर दिले आहे. भारतीय जवानांनी दिलेल्या उत्तरामुळे पाकचे धाबे दणाणले आहे', असंही मोदी म्हणाले.

'लोगोंवाला हे ऐतिहासिक युद्ध होतं. बीएसएफ आणि हवाई दलाने अद्भुत पराक्रम गाजवून ही लढाई जिंकली होती. या युद्धामुळे भारतासमोर जर कोणतीही शक्ती आली तरी ती सामना करू शकणार नाही, हे सिद्ध केले आहे', असंही मोदी म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: November 14, 2020, 12:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या