वॉशिंग्टन, 13 ऑक्टोबर : भारतासह कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या जगभरातही वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रूग्णांची संख्या 71 लाखांच्या पुढे गेली आहे. दुसरीकडे कोरोना लशीचे (Covid-19 Vaccine) कामही सुरू आहे. प्रत्येक देश कोरोना लस तयार करण्यासाठी दिवस-रात्र काम करत आहे. मात्र यातच अमेरिकेच्या जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) कंपनीने आपल्या कोरोना लसीची चाचणी थांबविली आहे. चाचणीत भाग घेणाऱ्या एका व्हॉलेंटिअरलला एक विचित्र आजार झाल्याचे समोर आले, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात, 'आम्ही आमच्या सर्व कोव्हिड-19 चाचण्या थांबवल्या आहेत. ट्रायलदरम्यान एका व्यक्तीला आजार झाला आहे, असे सांगितले.
वाचा-भारतात कोरोना मृत्यूंची संख्या कमी असण्याचं रहस्य; एक चांगलं एक वाईट
या महिन्याच्या सुरुवातीस जॉन्सन अँड जॉन्सन अमेरिकेत लस उत्पादकांच्या शॉर्ट लिस्टमध्ये सामील झाले. जॉन्सन अँड जॉन्सनची AD-26-SOV 2-S लस क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात असणारी अमेरिकेतील चौथी लस आहे. शेवटच्या अहवालात असे म्हटले होते की सुरुवातीच्या अभ्यासात लशीमुळे कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढते. आतापर्यंत क्लिनिकल चाचणीच्या निकालांच्या आधारे कोणतेही गंभीर दुष्परिणाम नाहीत असे संशोधकांनी म्हटले होते.
वाचा-सावधान! मोबाईल वापरताना झालेली 'ही' एक चूक तुम्हाला कोरोनापर्यंत घेऊन जाऊ शकते
जॉन्सन आणि जॉन्सन यांनी अलीकडेच या लसीची शेवटची टप्पा चाचणी सुरू केली. त्यानंतर कंपनीने म्हटले आहे की याअंतर्गत अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चिली, कोलंबिया, मेक्सिको आणि पेरू येथे 60 हजार लोकांच्या लसीची तपासणी केली जाईल. जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीच्या चाचणीवर बंदी घातल्याची बातमी अर्थातच मोठा धक्का आहे. यापूर्वी अॅस्ट्रॅजेनेकाच्या (Astra Zeneca) लसवर बंदी होती.
वाचा-पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका पण महिलांनी घेतला धसका; काय आहे कारण वाचा
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्रॅजेनेकाची लस कोरोनाची लस बनवण्याच्या शर्यतीत अग्रेसर होती, मात्र यापूर्वी काही व्हॉलेंटिअरना लस दिल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली, त्यानंतर तिसर्या टप्प्यातील चाचणी 6 सप्टेंबर रोजी थांबविण्यात आली. दरम्यान, ब्रिटन आणि भारतात ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्रॅजेनेका लसची पुन्हा चाचणी सुरू झाली आहे. अमेरिका किंवा अन्य देशांना अद्याप मान्यता मिळणे बाकी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus