Home /News /coronavirus-latest-news /

भारतात कोरोना मृत्यूंची संख्या कमी असण्याचं रहस्य; एक चांगलं एक वाईट

भारतात कोरोना मृत्यूंची संख्या कमी असण्याचं रहस्य; एक चांगलं एक वाईट

जगभरात Coronavirus ने घेतलेल्या बळींचा विचार केला तर जर दहा लाख लोकसंख्येमागे भारतात सर्वांत कमी मृत्यू झाले आहेत. काय आहे कारण?

    नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : भारताची लोकसंख्या 130 कोटींच्या घरात असून, जगभरातील कोरोनाबाधितांच्या (Coronavirus)संख्येबाबत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 70 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. पण ज्या देशांमध्ये Corona मृत्यूंचं (Death due to covid-19) प्रमाण अधिक आहे त्यांच्या तुलनेत भारतात Covid-19 मुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा खूपच कमी सांगितला जात आहे आणि यावर जगभरातले संख्याशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक, वैद्यकीय तज्ज्ञ शंका उपस्थित करत आहेत. भारतात कोरोना बळींची संख्या तुलनेनं कमी राहण्यामागे दोन प्रमुख कारणं आहेत. ती आता पुढे येऊ लागली आहेत. त्यातले एक कारण चांगलंच म्हणता येईल पण एक मात्र दिशाभूल करणारं किंवा भविष्यात घातक ठरणारं आहे. भारतीयांची प्रतिकारशक्ती चांगली भारतात तरुणांचं प्रमाण मोठं आहे. इतर देशांच्या मानाने देश तरुण आहे. त्यात विषाणूजन्य आजार आधीच होऊन गेल्याने रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढलेली आहे, अशी कारणं कोरोनाच्या केसेस कमी असण्यासाठी दिली जात आहेत. त्याचबरोबर मृत्यूंची नोंद योग्य पद्धतीने होत नाबी हेही एक कारण कमी मृत्यूसंख्येमागे असू शकतं. यामुळे भारतातील कोरोनाच्या आकडेवारीबद्दल काही प्रश्न निर्माण केले जात आहेत. आकडेवारी काय सांगते? मार्च महिन्यात भारतातील कोरोनामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर आतापर्यंत 1,08,334 जणांचा मृत्यू झाल्याचं भारत सरकारनी रविवारी (11 ऑक्टोबर) जाहीर केलं. दर 100 कोरोनाबाधितांपैकी मरण पावलेल्यांची सरासरी ही एवढा खंडप्राय देश असून आणि दोन नंबरची लोकसंख्या असूनही खूप कमी आहे. जॉन हॉफकिन युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या 20 देशांमध्ये ही सरासरी 1.5 टक्के आहे. हाच दर सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या अमेरिकेत 2.8 टक्के आहे. दर एक लाख लोकसंख्येमध्ये मृत्यूंचं अमेरिकेतील प्रमाण 64.74 आहे तर भारतात ते केवळ 7.73 आहे. Parle G सोशल मीडियावर ठरलं जीनिअस! TV चॅनेल्सविषयी घेतली मोठी भूमिका तरुणांचा देश UN च्या वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स (World Polulaton Prospects)रिपोर्टनुसार भारतात जगातील सर्वाधिक तरुण नागरिक आहेत. भारतीय नागरिकांचं सरासरी वय 28.4 वर्षं आहे. कोरोना मृत्यूचं प्रमाण कमी असण्यामागे हेच कारण असल्याचा भारताचा दावा आहे. कोरोनामुळे ज्येष्ठांचे किंवा विविध व्याधींनी ग्रस्त रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त आहे. वृद्धांची लोकसंख्या तरुण असल्यामुळे मृत्यूसंख्या कमी आहे. पण फ्रान्सशी तुलना केली तर तिथल्या तरुणाईचं सरासरी वय 42.3 वर्षं असताना तिथे 7 लाख बाधितांमध्ये 32 हजार मृत्यू झाले आहेत. कडक लॉकडाउन भारत सरकारच्या म्हणण्यानुसार 30 जानेवारी 2020 ला भारतातील पहिल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्यानंतर मार्चच्या मध्यात सरकारनी उपाययोजना सुरू केली. या मधल्या काळात अनेकांना बाधा झालेली असू शकते. फेब्रुवारी ते मार्च या काळात इटलीत 24 हजार जणांना बाधा झाली त्यात 2 हजारांचा मृत्यु झाला. तसंच फ्रान्समध्येही 5 हजार 500 जणांना बाधा झाली आणि 150 जणांचा मृत्यू झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 25 मार्चला देशभरात कडक लॉकडाउन जाहीर केला. त्यामुळे भारताला कोरोनाचा सामना करण्याची तयारी करायला वेळ मिळाला असावा. तज्ज्ञांचं असं मत आहे की, लॉकडाउनमुळे भारतातील डॉक्टरांना इतर देशांतील उपचार पद्धतींचा अभ्यास करायला वेळ मिळाला असावा. "मार्च महिन्यापर्यंत रुग्णांना ऑक्सिजन देणं असो किंवा आयसीयूमध्ये ठेवण्यासंबंधी असो उपचारांचे बहुतांश प्रोटोकॉल तोपर्यंत जगभर निश्चित झाले होते", असं नवी दिल्लीच्या AIIMS मध्ये कम्युनिटी मेडिसिन विषय शिकवणारे प्राध्यापक आनंद कृष्णन यांनी AFP ला सांगितलं. संभाव्य प्रतिकारशक्ती भारतीय नागरिकांमध्ये डेंग्यूसारख्या इतर विषाणूजन्य आजारांमुळे प्रतिकारशक्ती विकसित झाली असावी आणि कोरोनाविरुद्ध लढताना तिचा फायदा झाला असावा, असं मत व्हायरॉलॉजिस्ट टी. जेकब जॉन यांनी एएफपीकडे व्यक्त केलं. हे मत व्यक्त होत असलं तरीही याबद्दल अधिक संशोधन व्हायला हवं. पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका पण महिलांनी घेतला धसका; काय आहे कारण वाचा कमी नोंद सद्यस्थितीत भारतात सगळ्या कोरोना मृत्यूंची नोंद झालेली नाही. भारताची 70 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आणि तिथे रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याशिवाय त्याची सरकारदरबारी नोंद होत नाही. अनेक शहरांतील स्मशानभूमीतून मिळालेली आकडेवारी आणि स्थानिक प्रशासनाची आकडेवारी यातही तफावत आहे. "आमची सध्याची मृत्यू नोंदणी यंत्रणा नेहमी मृत्यूंची नोंद योग्य पद्धतीने ठेवत नाही. सरकारने केलेल्या सेरॉलॉजीकल टेस्टद्वारे कोरोनाविरुद्ध लढलेल्या व्यक्तींच्या शरीरातील अँटिबॉडीजची माहिती रक्तातून मिळते. ती आकडेवारी मृतांच्या आकडेवारीपेक्षा 10 पट अधिक आहे. यातून अनेक कोविड मृत्यूंची नोंदच झालेली नसल्याचं दिसून येतं,’ असं मत बेंगळुरूमधील फिजिशियन डॉ. हेमंत शेवडे यांनी एएफपीकडे व्यक्त केलं. तसंच काही रुग्णांच्या मृत्यूला कोरोना कारणीभूत ठरलेला नाही. धक्कादायक! अमेरिकेत माणसांकडून प्राण्यांमध्ये कोरोनाचा फैलाव? 10,000 मृत्यू अचूकता कशी आणता येईल? चाचण्यांची संख्या वाढवणं, मृत्यूंच्या आकडेवारीची योग्य नोंद आणि कोविडची शंका असलेल्या मृतदेहांच्या पोर्स्टमॉर्टेमची संख्या वाढवणं, घरात झालेल्या मृत्यूंची नोंद करणं या सर्व उपयांनी आकडेवारीत अचूकता आणता येईल, असं डॉ. शेवडे आणि इतर तज्ज्ञांचं मत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या मुंबई शहरात मार्च ते जुलै या कालखंडात गेल्या वर्षीच्या तुलनेत 13 हजार अतिरिक्त मृत्यूंची नोंद झाली आहे. सरकारने जाहीर केलेल्या कोरोना मृतांच्या आकडेवारीच्या दुप्पट ही मृतांची संख्या असल्याचं इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या