पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका पण महिलांनी घेतला धसका; काय आहे कारण वाचा
जगभरातील कोरोनाव्हायरस (coronavirus) रुग्णांची संख्या पाहिली तर त्यामध्ये महिलांपेक्षा पुरुष रुग्णांची संख्या जास्त आहे. अनेक अभ्यासानुसार पुरुषांना कोरोनाचा धोका अधिक आहे, असं असतानादेखील पुरुषांपेक्षा महिलांमध्येच जास्त भीती आहे.


जागतिक अहवालानुसार कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक धोका हा पुरुषांना आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांवर व्हायरसचा परिणाम कमी होतो आहे. असं असतानाही महिलांमध्ये कोरोनाव्हायरसबाबतची चिंता जास्त आहे.


फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या Yougov survey नुसार 64% फ्रेंच महिलांना आपल्याला कोरोनाव्हायरस होण्याची आणि संक्रमण पसरण्याची चिंता आहे. तर पुरुषांमध्ये हे प्रमाण 50 टक्के आहे.


अमेरिकेच्या डार्टमाऊथ कॉलेजमधील संशोधकांनी ऑगस्टच्या मध्यात प्रसिद्ध केलेल्या नुसारदेखील कोरोना महासाथीमुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये चिंता अधिक आहे. अमेरिकेच्या राजकारण आणि लिंग या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.


जूनमधील सर्वेक्षणानुसार जर सरकारने कोणतीही बंधनं ठेवली नाही तर 37 टक्के पुरुष दैनंदिन जीवन सुरू करण्यास तयार आहेत. मात्र महिलांमध्ये हे प्रमाण 24 टक्के आहे.


हेल्थकेअर, शिक्षण अशा क्षेत्रात महिला उच्च पदांवर कार्यरत आहे. अभ्यासानुसार वैद्यकीय आणि आरोग्य सेवेत 3 टक्के महिला सीईओ पदावर आहेत. आरोग्यसेवेत 80 महिला कर्मचारी आहेत.