Home /News /coronavirus-latest-news /

सावधान! मोबाईल वापरताना झालेली 'ही' एक चूक तुम्हाला कोरोना संसर्गापर्यंत घेऊन जाऊ शकते !

सावधान! मोबाईल वापरताना झालेली 'ही' एक चूक तुम्हाला कोरोना संसर्गापर्यंत घेऊन जाऊ शकते !

जगातील विविध विज्ञान संस्था कोरोना विषाणूबाबत संशोधन करत आहेत. कोरोनाचा विषाणू (CoronaVirus) मोबाईल स्क्रीनवर 28 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो असं एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. संशोधनामध्ये अजून कोणती माहिती समोर आली आहे जाणून घेऊया

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय विज्ञान एजन्सीने कोरोना (Corona)संदर्भात महत्वाचं संशोधन केलं. कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्यासाठी नोटा, स्मार्टफोनचे स्क्रीन आणि स्टेनलेस स्टील सारख्या वस्तू मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. स्मार्टफोनची स्क्रीन, स्टेनलेस स्टील आणि नोटांवर तब्बल 28 दिवसांपर्यंत कोरोनाचा व्हायरस जिवंत राहू शकतो अशी धक्कादायक माहिती या संशोधनामधून समोर आली आहे. आपल्या जीवनात या सर्व गोष्टी अत्यावश्यक आहेत. त्याचा वापर करणं आपण बंद करू शकत नाही, पण काळजी घेणं आपल्या हातात आहे. हात स्वच्छ धुणे, साबणाचा वापर करणे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे. या गोष्टींचं पालन करणं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर डिजिज प्रिपेयर्डनेस (ACDP)च्या शोधामध्ये हे दिसून आलं आहे की, सार्स-सीओव्ही -2 (SARS-CoV-2)  कमी तापमान आणि छिद्रयुक्त असलेल्या पदार्थांवर जास्त काळ जिवंत राहू शकतो. यामध्ये प्लास्टिक, स्टेलनेस स्टील सारख्या वस्तूंचा समावेश आहे. कागदी नोटांवर कोरोनाचा व्हायरस जास्त काळ जिंवत राहू शकतो. संशोधनामध्ये हेदेखील दिसून आलं की, तापमान 20 डिग्री पेक्षा कमी असल्यावर स्मार्टफोनची स्क्रीन, स्टेनलेस स्टील आणि नोटांवर कोरोनाचा विषाणू प्रबळपणे 28 दिवसांपर्यंत जिंवत राहिला होता. तर जसंजसं तापमान वाढत गेलं तस-तशी त्याची शक्ती कमी होती गेली. भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 60 लाखांच्या पुढे गेली आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत जात आहे. कोरोनावर अद्यापही खात्रीशीर लस निघालेली नाही. त्यामुळे कोरोना होऊन न देणं हाच कोरोनावरचा उपाय आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Mobile

    पुढील बातम्या