माता न तू वैरणी..औरंगाबादेत प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाला घरात डांबले

आरोपी महिला वेरूळ येथील भिलवाडा परिसरात राहते. तिचे अनिल दिलीप मोरे (रा. माटेगाव, ता. कन्नड) याच्याशी प्रेमसंबंध आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 01:33 PM IST

माता न तू वैरणी..औरंगाबादेत प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाला घरात डांबले

औरंगाबाद, 14 जून- खुलताबाद तालुक्यातील वेरूळ परिसरात 'माता न तू वैरणी' याचा प्रत्यय आला आहे. एका जन्मदात्रीने आपल्या पोटच्या आठ वर्षांच्या मुलाला प्रियकराच्या मदतीने घरात डांबून ठेवले. एवढेच नाही तर त्याला तब्बल आठ तास पलंगाला दोरीने बांधून ठेवून त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाने पीडित मुलाची सुटका केली आहे. दरम्यान, या प्रकरणात निर्दयी मातेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे हे प्रकरण?

आरोपी महिला वेरूळ येथील भिलवाडा परिसरात राहते. तिचे अनिल दिलीप मोरे (रा. माटेगाव, ता. कन्नड) याच्याशी प्रेमसंबंध आहेत. तो कायम महिलेच्या घरी येत-जात होता. मात्र, अनिलचे घरी कायम येणे-जाणे पीडित मुलाला खटकत होते. मंगळवारी (11 जून) सकाळी दहाच्या सुमारास अनिल महिलेच्या घरी आला. महिलेने पीडित मुलाला बाहेर खेळण्यासाठी जाण्यास सांगितले. मात्र, त्याने स्पष्ट नकार दिला. यावरुन तिने त्याला बेदम मारहाण केली. अनिलने देखील मुलाला काठीने मारहाण केली. नंतर त्याला पलंगाला बांधून ठेवले. सकाळी 10 ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत त्याचे हात पाय बांधून त्याला घरात डांबून ठेवले होते. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या निदर्शनास आला. तिने खुलताबाद पोलिसांना ही माहिती दिली. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी महिलेचे घर गाठले. पोलिसांनी मुलाची सुटका करत आरोपी महिल आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. पीडित मुलाला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


बंद खोलीत तरुणाला पट्ट्यानं अमानुष मारहाण, VIDEO व्हायरल

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2019 01:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...