घर खरेदी करणाऱ्यांना मोदी सरकार देऊ शकतं मोठा दिलासा

मोदी सरकारला रियल इस्टेट सेक्टरमधली मंदी संपवायची आहे. म्हणून बजेटमध्ये ठोस पावलं उचललेली दिसू शकतात.

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 01:14 PM IST

घर खरेदी करणाऱ्यांना मोदी सरकार देऊ शकतं मोठा दिलासा

मुंबई, 14 जून : मोदी सरकार आगामी बजेटमध्ये घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. CNBC आवाजला मिळालेल्या माहितीनुसार 5जुलैला सादर होणाऱ्या पूर्ण बजेटमध्ये गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी असू शकेल. सरकार बजेटमध्ये गृहकर्जाच्या प्रिन्सिपल आणि व्याजावर कर सवलत देण्याच्या विचारात आहे. याशिवाय रियल इस्टेट सेक्टरसाठीही काही पावलं उचलली जातील. सूत्रांच्या माहितीनुसार अर्थमंत्रालयानं CREDAI कडून आकडेवारी मागितली आहे. मंत्रालय कर सवलत दिल्यानं किती बोजा पडेल याचा विचार करतंय.

रियल सेक्टरमधली मंदी संपवण्याचा प्रयत्न

मोदी सरकारला रियल इस्टेट सेक्टरमधली मंदी संपवायची आहे. म्हणून बजेटमध्ये ठोस पावलं उचललेली दिसू शकतात. याच्या वेगवेगळ्या पर्यायांचा अर्थ मंत्रालय विचार करतंय. या पर्यायांमध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात आणि प्रिन्सिपलवर कर सवलत वाढवली जाऊ शकते. आता ती किती वाढवली जाईल, याचे विविध मार्ग असू शकतात.

1.14 लाख गुंतवून सुरू करा व्यवसाय आणि कमवा महिन्याला 15 हजार रुपये

पाकिस्तानला हरवण्यासाठी फक्त एका गोष्टीची गरज, कोहलीनं सांगितली स्ट्रॅटर्जी

Loading...

अर्थ मंत्रालयानं CREDAI कडून मागवली आकडेवारी

अर्थ मंत्रालयानं रियल इस्टेटची संस्था CREDAI ला विचारलं की आतापर्यंत किती घरं आहेत, ज्यावर गृहकर्ज सुरू आहे आणि किती घरं तुम्ही बांधणार ज्यावर गृहकर्ज मिळू होऊ शकतं. म्हणजे मंत्रालयाला कर सवलतीची मर्यादा वाढवली तर किती बोजा पडू शकतो, हे कळेल.

सामना रद्द झाल्यामुळं चक्क रडली झिवा, फोटो व्हायरल

CREDAI केलेली सवलतीची मागणी

CREDAI नं मागणी केली होती की सेक्शन 80C अनुसार 5 लाख प्रिंसिपलवर दर वर्षाला 5 लाखासाठी 5 वर्षासाठी कर सवलत द्यावी आणि जी व्याज दर सूट आहे ती 2 लाख रुपयांना वाढून 4 लाख रुपये करावी. अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं की मोठी सूट देणं शक्य होणार नाही, पण किती द्यावी याचा विचार सुरू आहे.


मुसळधार पावसाचा धुमाकूळ; दरड कोसळून अनेक कारचा चुराडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 01:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...