कोरोना संशयितांना शोधण्याचा नवा फंडा, गुप्तचर लावणार छडा

कोरोना संशयितांना शोधण्याचा नवा फंडा, गुप्तचर लावणार छडा

त्यांचं मोबाईल लोकेशन, सोशल मीडिया आणि इतर Appsवरून त्यांची सर्व माहितीवरून सायबर विभाग गोळा केली जाते.

  • Share this:

सिंगापूर 20 मार्च : ‘कोरोना’ने जगभर धुमाकूळ घातला आहे. त्यावर अजुन औषध सापडलेलं नाही. त्यामुळे जगात सगळेच देश धास्तावले आहेत. कोरानाचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न करणं हाच त्यावरचा सर्वात मोठा उपाय असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोना संशयितांनी आपली ओळख लपवून ठेवल्यामुळे त्याचा प्रसार होत असल्याचं पुढे आलं आहे. भारतातही असे अनेक प्रकार घडले आहेत. कोरोनाग्रस्त ज्या ज्या लोकांच्या संपर्कात आला. त्या सगळ्यांना क्वारंटाईन करणं आवश्यक असतं मात्र ते लोक पुढे येत नाहीत. आपली ओळख लपवून ठेवतात. यावर सिंगापूर सरकारने नवा फंडा शोधून काढला.

संशयिताची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर डॉक्टर त्याच्याकडून तो कुणा कुणाच्या संपर्कात आला याची सगळी माहिती काढून घेतात. त्यानंतर ती माहिती पोलिसांना पुरवली जाते. नंतर पोलीस आणि गुप्तचर अधिकारी मिळून त्या संशयितांना शोधून काढतात. त्यांचं मोबाईल लोकेशन, सोशल मीडिया आणि इतर Appsवरून त्यांची सर्व माहितीवरून सायबर विभाग गोळा करतो आणि त्या माणसांना ताब्यात घेऊन क्वारंटाईन केलं जातं.

औषध सापडलं

कोरोना विषाणूमुळे जगभरात 9 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे कोरोनाची दहशत वाढली आहे. मात्र अद्याप कोरोनाला हरवण्यासाठी औषध सापडले नाही आहे. दरम्यान, अमेरिकेने कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी मलेरिया औषधास मान्यता दिली आहे.

इटलीमध्ये 3405 लोकांचा मृत्यू, लष्काराचे जवान करत आहेत मृतांचे अंत्यसंस्कार

चीनच्या वुहानमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूने जगात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूने लोकांचे जीव घेतले आहे. याआधी कोरोनाच्या लसीची चाचणी सध्या अमेरिकेत सुरू आहे. असे असताना अमेरिकेने कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी मलेरियाच्या औषधास मान्यता दिली आहे.

हे वाचा 

पाकने उघडली कोरोनाची नर्सरी! आतापर्यंतचा सर्वात भयंकर VIDEO

पत्नीला फसवून दुसऱ्या महिलेसोबत गेला इटलीला, झाली कोरोनाची लागण

 

First published: March 20, 2020, 4:01 PM IST

ताज्या बातम्या