नवी दिल्ली, 19 मार्च : आपल्या पत्नीची फसवणूक करुन दुसऱ्या महिलेसोबत परदेशात सहलीला जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. पत्नीची फसवणूक केल्यामुळे या पतीला महाभयंकर कोरोना विषाणूची लागण झाली आहे. परदेशातून आल्यानंतर त्याला त्रास होऊ लागला. यावेळी आरोग्य केंद्रात अधिकाऱ्यांकडून विचारणा केली असता पतीचं हे इटली प्रकरण उघडकीस आलं आहे.
ही इंग्लंडची घटना आहे. द सनच्या वृत्तानुसार, येथे राहणाऱ्य एका 30 वर्षीय तरुणाचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. तो आपल्या पत्नीला फसवून दुसऱ्या महिलेसह बाहेरगावी इटलीला फिरायला गेला होता. ऑफिसच्या कामासाठी जात असल्याचं पतीने पत्नीला सांगितलं होतं. सध्या इटलीत जीवघेण्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत इटलीला गेलेल्या या पतीला नेमकी कोरोनाची लागण झाली. इटलीमध्येच तो कोरोना विषाणूमुळे आजारी पडला. जेव्हा तो आणि त्याची प्रेयसी हे दोघे इंग्लंडला आले तेव्हा त्यांची तब्येत अचानक ढासळली. त्याची तपासणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला.
इतकेच नाही तर त्याच्याबरोबर इटलीला गेलेल्या महिलेलाही संसर्ग झाल्याचे दिसून आले. दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते.
आरोग्य केंद्रावर डॉक्टरांनी जेव्हा त्याची विचारपूस केली तेव्हा त्याने सांगितले की, तो आपल्या पत्नीला फसवून इटलीला त्या महिलेसोबत फिरायला गेला होता. आपण इटलीला कामाच्या निमित्ताने जात असल्याचे त्याने पत्नीला सांगितले होते. नवरा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याचे कुटुंबीयही वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. याशिवाय बरे झाल्यानंतर त्याला घरीच राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
हे वाचा : लग्नाची विचित्र गोष्ट! मायलेकी एकत्र गेल्या हनीमूनला