मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /या प्रसिद्ध कंपनीमध्ये पत्रकारांची जागा घेणार 'रोबो', सुमारे 50 जणांची नोकरी धोक्यात

या प्रसिद्ध कंपनीमध्ये पत्रकारांची जागा घेणार 'रोबो', सुमारे 50 जणांची नोकरी धोक्यात

एकविसाव्या शतकात काही तंत्रज्ञानांनी तर माणसाचीच जागा घेतली आहे. यूएस आणि युकेमधील काही मीडिया अहवालांनुसार मायक्रोसॉफ्ट त्यांच्या MSN वेबसाइटसाठी काम करणाऱ्या काही पत्रकारांऐवजी स्वयंचलित प्रणाली वापरणार आहे.

एकविसाव्या शतकात काही तंत्रज्ञानांनी तर माणसाचीच जागा घेतली आहे. यूएस आणि युकेमधील काही मीडिया अहवालांनुसार मायक्रोसॉफ्ट त्यांच्या MSN वेबसाइटसाठी काम करणाऱ्या काही पत्रकारांऐवजी स्वयंचलित प्रणाली वापरणार आहे.

एकविसाव्या शतकात काही तंत्रज्ञानांनी तर माणसाचीच जागा घेतली आहे. यूएस आणि युकेमधील काही मीडिया अहवालांनुसार मायक्रोसॉफ्ट त्यांच्या MSN वेबसाइटसाठी काम करणाऱ्या काही पत्रकारांऐवजी स्वयंचलित प्रणाली वापरणार आहे.

मुंबई, 31 मे : एकविसाव्या शतकात अनेक तंत्रज्ञानांनी माणसाचे काम सोपे केले आहे. अगदी काही तंत्रज्ञानांनी तर माणसाचीच जागा घेतली आहे. दरम्यान यूएस आणि युकेमधील काही मीडिया अहवालांनुसार मायक्रोसॉफ्ट (Microsoft) त्यांच्या MSN वेबसाइटसाठी काम करणाऱ्या काही पत्रकारांऐवजी स्वयंचलित प्रणाली वापरणार आहे. या वेबसाइटसाठी काही बातम्या, स्टोरीज निवडण्याचे काम या पत्रकारांकडून करण्यात येते. आता या पत्रकारांऐवजी ही स्वयंचलित प्रणाली वृत्तसंस्था, न्यूज ऑर्गनायझेशन्समध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्या निवडण्याचे काम करेल. थोडक्यात आता या बातम्या निवडण्याचे, त्याकरता हेडलाइन आणि फोटो निवडण्याचे काम माणसांऐवजी 'रोबो' करणार आहे. या संदर्भातील वृत्त बीबीसीने दिले आहे.

मायक्रोसॉफ्टने याबाबत अशी माहिती दिली आहे की, 'इतर कंपनींप्रमाणेच आम्ही देखील आमच्या कंपनीचे मुल्यमापन करत असतो. यामुळे काही ठिकाणी गुंतवणूक वाढू शकते तर काही ठिकाणी पूनर्वसन देखील होऊ शकते. हा निर्णय सध्याच्या कोरोना व्हायरस पँडेमिकमुळे घेण्यात आलेला नाही आहे.'

(हे वाचा-तब्बल 9 वर्षांनंतर रचला इतिहास, अमेरिकेनं आपल्या भूमीतून पाठवले अंतराळवीर)

अनेक टेक कंपन्यांप्रमाणेच मायक्रोसॉफ्ट देखील काही वृत्त संस्थांना पैसे देऊन न्यूज कंटेट त्यांच्या वेबसाइटवर पोस्ट करते. मात्र हे काम काही पत्रकारांकडून करण्यात येते. Seattle Times ने दिलेल्या अहवालानुसार मायक्रोसॉफ्टने बातम्यांचा मजकूर आणि संबधित इतर कामांसाठी स्वयंचलित प्रणाली निवडल्यास जवळपास 50 कंत्राटी पत्रकारांना त्यांची नोकरी गमवावी लागेल. जूनच्या अखेरपर्यंत या पत्रकारांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. मात्र जे फूलटाइम काम करणारे पत्रकार आहेत, त्यांच्या नोकरीस कोणताही धोका नाही आहे. नोकरी धोक्यात असणाऱ्या एका पत्रकाराने अशी प्रतिक्रिया दिली की, 'ही बाब मनोधैर्य खच्चीकरण करणारी आहे की, मशिन्स आमची जागा घेऊ शकतात.'

(हे वाचा-VIDEO: कोरोनाने हाहाकार असतानाच अमेरिकेतल्या 30 शहरांत भडकले दंगे)

काही काढून टाकण्यात आलेल्या पत्रकारांनी या 'आर्टिफिशीअल इंटेलिजन्स'बाबत संशय व्यक्त केला आहे. संपादकीय निर्देशांचे पालन या स्वयंचलित प्रणालीकडून होऊ शकेल का असा सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान, The Guardianच्या वृत्तानुसार नोकरी गमावलेल्या 27 पत्रकारांना युकेच्या PA Media ने नवीन  नोकरी देऊ केली आहे. मायक्रोसॉफ्ट कॉस्ट कटिंगकरता 'रोबो पत्रकारिते'मध्ये गुंतवणूक करत आहे तर ही प्रणाली कशी काम करेल यासंदर्भात गुगलकडून देखील संशोधन सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Robot