जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी रुग्णालयात काम करतेय ही राजकुमारी, व्हायरल PHOTO वर कौतुकाचा वर्षाव

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी रुग्णालयात काम करतेय ही राजकुमारी, व्हायरल PHOTO वर कौतुकाचा वर्षाव

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी रुग्णालयात काम करतेय ही राजकुमारी, व्हायरल PHOTO वर कौतुकाचा वर्षाव

स्वीडन (Sweden)ची राजकुमारी सोफिया (Princess Sofia)ने कोरोनो व्हायरस (CoronaVirus)च्या रुग्णांची सेवा करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

स्वीडन,17 एप्रिल : कोरोनाच्या संकटापासून आपल्या देशाला वाचवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहेत. हॉस्पिटलमधील कर्मचारी कोरोनाच्या रुग्णांची विशेष सेवा करत आहे. याच पार्श्वभूमिवर स्वीडन (Sweden)ची राजकुमारी सोफिया (Princess Sofia)ने कोरोनो व्हायरस (CoronaVirus)च्या रुग्णांची सेवा करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असणाऱ्या एका हॉस्पिटलमध्ये सोफियाने काम करण्यास सुरुवात केली आहे. 35 वर्षीय सोफियाने याकरता 3 दिवसांचे ऑनलाइन प्रशिक्षण पूर्ण केले आहे. स्टॉकहोमधील सोफिया हेमेट हॉस्पिटलमध्ये सेवा करण्यासाठी या प्रशिक्षणामुळे परवानगी मिळाली आहे. याठिकाणी सोफिया मानद सदस्य आहे. (हे वाचा- पाकिस्तान कंगाल होणार? कोरोनामुळे हे संकट ओढावण्याची दाट शक्यता ) द रॉयल सेंट्रलने दिलेल्या माहितीनुसार सोफिया आरोग्य साहाय्यक म्हणून काम करणार आहे. थेट कोरोनाच्या रुग्णांची सेवा यामध्ये सामाविष्ट नसली तरी यामुळे कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना हातभार लागणार आहे. हॉस्पिटलच्या या ऑनलाइन कोर्समधून प्रशिक्षणार्थींना सफाई, स्वयंपाक, उपकरणं किटाणूरहित करणे आणि इतर काही चिकित्साविरहीत कामांचा समावेश आहे. या कोर्सच्या माध्यमातून आठवड्यातून 80 लोकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

जाहिरात

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी राजकुमारी सोफियाने स्वत:हून पुढाकार घेतल्याची माहिती मिळते आहे. राजकुमारीचा एक फोटो देखील सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्टाफबरोबर राजकुमारी दिसत आहे. संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात