कोरोना व्हायरसचे जगभरातील 24 तासांतले अपडेट वाचा एका क्लिकवर

जगभरात कोरोना व्हायरस अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. 24 तासांत कोविड-19च्या 86 हजार 198 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

जगभरात कोरोना व्हायरस अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. 24 तासांत कोविड-19च्या 86 हजार 198 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

  • Share this:
    मुंबई, 18 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरस अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. 24 तासांत कोविड-19च्या 86 हजार 198 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जगभरात आतापर्यंत 22 लाख 48 हजार 500 हून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल आहे. तर जगभरात 1 लाख 52 हजार 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी अमेरिका, स्पेन, ब्रिटन या देशांमधील सर्वात जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जाणून घ्या जगभरातील आकडेवारी. भारत भारतात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 13 हजार 835 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 452 रुग्णांचा व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त गंभीर स्थिती आहे. 3202 कोरोनाचे रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. अमेरिका शुक्रवारी 32 हजार 165 नवीन केसेस पॉझिटिव्ह आल्या आहेत. आतापर्यंत अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या 7,09,735 वर पोहोचली आहे असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. शुक्रवारी अमेरिकेत या संसर्गामुळे 2,535 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण मृत्यूची संख्या 37,154 वर गेली आहे. ब्रिटन- ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार शुक्रावारी संसर्गामुळे 7 847 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 14,576 लोकांचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 5,599 लोकांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. आतापर्यंत सुमारे 1 लाख 9 हजार लोकांना देशात कोरोनाची लागण झाली आहे. इटली शुक्रवारी 3,493 नवीन केसेस आढळल्या आहेत. देशात एकूण संख्या 1 लाख 72 हजार 434 वर पोहोचली आहे. 24 तासांत 575 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 22 हजार 745 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. स्पेन- स्पेनमधील कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृतांची संख्या शुक्रवारी 19,500 च्या जवळपास पोहचली. शुक्रवारी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 585 लोकांचा मृत्यू झाला आहे. संसर्गामुळे 19,478 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्स- गुरुवारी नवीन केसेस सापडल्या होत्या मात्र शुक्रवारी परिस्थिती नियंत्रणात होती असं फ्रान्समधील सरकारचं म्हणणं आहे. गुरुवारी 14 हजार तर शुक्रवारी 1 हजार नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. देशात 1 लाख 47 हजार 969 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 18 हजार 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इराण- इराणमध्ये 24 तासांत 89 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला देशातील साथीच्या आजारामुळे एकूण मृत्यूची संख्या 4, 8 88 वर पोहचली आहे. इराणमध्ये सलग चौथ्या दिवशी कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या दुप्पट झाली. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते किनोष जहांपोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 4,958 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीन- कोविड -19 संदर्भात तथ्य लपविण्यास चीनने शुक्रवारी नकार दिला. चीनच्या वुहानमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 पाकिस्तान- 429 तबलीगी जमातमधील सदस्यांना पाकिस्तानात संसर्ग झाल्याचे आढळले पाकिस्तानच्या सिंध प्रांतात तबलीघी जमात संघटनेच्या 92 सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. सिंधचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह म्हणाले की, पंजाब प्रांतातील रायविंद येथे तबलीगी जमातच्या वार्षिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या 92 सदस्यांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. त्यांनी माहिती दिली की विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सर्व संक्रमित लोकांना स्वतंत्र निवासस्थानी पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर, शुक्रवारी संसर्गाची एकूण संख्या 7,260 पर्यंत वाढली असून शुक्रवारी 137 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
    First published: