वजनदार कारवाई! 250 किलोच्या दहशतवाद्याला पोलीस व्हॅन पडली अपुरी

वजनदार कारवाई! 250 किलोच्या दहशतवाद्याला पोलीस व्हॅन पडली अपुरी

वजनदार दहशतवादी पकडण्यासाठी मागवावा लागला ट्रक

  • Share this:

मोसूल, 19 जानेवारी: इराकमधील मोसूल इथे ISISचा दहशतवाद्याला बेड्या ठोकण्यासाठी आलेले पोलीसही दहशतवाद्याकडे पाहून बुचकळ्यात पडले. 250 किलोग्राम वजनाचा गलेलठ्ठ दहशतवादी बेडवर बसला होता. पोलिसांना पाहून तो स्वत: हलू ही शकला नाही. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या खऱ्या पण पोलीस स्थानकात नेण्यासाठी त्याच्या वजनाला पुरेल असं वाहन नसल्यानं पिकअप ट्रक बोलवण्यात आला. या पिकअप ट्रकच्या मदतीनं या दहशतवाद्याला पोलीस स्थाण्यात घेऊन जाण्यात आलं. या दहशतवाद्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या दहशतवाद्याला ओबेसिटीचा त्रास असल्याचं सांगितलं जात आहे.

ISIS दहशतवादी शिफ अल निमा ज्याला अबु अब्दुल बारी या नावानं ओळखलं जातं. याला इराकमधील स्वाट टीमने पश्चिम इराकमधील एका परिसरातून बेड्या ठोकल्या. ISIS दहशतवाद्यांना आपल्या भाषणांद्वारे त्यांचं ब्रेन वॉश करणं आणि भडकवण्याचे काम हा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशवादी अबु अब्दुर बारी याने 2014 रोजी मस्जिदीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा फतवा काढला होता. त्यानुसार बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. आता त्याने मोसुल परिसरावर आपला कब्जा केल्यानं स्वाट टीमनं त्याला सापळा रचून पकडलं आहे.

हा दहशतवादी जास्त वजनामुळे पोलिसांच्या गाडीतून येऊ न शकल्यामुळे विशेष ट्रकद्वारे त्याला नेण्यात आलं आहे. सोशल मीडियावर याचा फोटो व्हायरल होत आहे. निष्पाप लोकांचे जीव घेणारा दहशतवादी स्व:ता मात्र दोन पायावर उभं राहू शकत नाही असं लंडनमधील थिंक टँक क्‍युलियामचे फाऊंडर माजिद नवाज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

First published: January 19, 2020, 10:05 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading