48 वर्षांनंतर अखेर कुटुंबीयांशी भेट, फेसबुक व्हिडीओमुळं चमत्कार

48 वर्षांनंतर अखेर कुटुंबीयांशी भेट, फेसबुक व्हिडीओमुळं चमत्कार

सोशल मीडियामुळं जग जवळ आलं आहे. त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. बांग्लादेशातील एक व्यक्ती फेसबुक व्हिडिओमुळं तब्बल 48 वर्षानंतर कुटुंबीयांना भेटला आहे.

  • Share this:

ढाका, 19 जानेवारी:  सोशल मीडियाचे जेवढ अधिक फायदे आहे तेवढे तोटेही असल्याचं समोर आलं आहे. दिवसेंदिवस सोशल मीडियावरील चांगल्या आणि वाईट बातम्या आपल्या कानी पडतात. मात्र बांग्लादेशातील ढाका इथं सोशल मीडियामुळं तब्बल 48 वर्षानंतर एका व्यक्तीची कुटुंबीयांशी भेट झाली आहे. वयाच्या 30 व्या वर्षी गायब झालेले हबीबूर 48 वर्षांनंतर सापडले आहे. एका फेसबुक व्हिडीओमुळं मुलांना त्यांचे वडिल भेटले.

कसे हरवले होते हबीबूर?

ढाक्यात हबीबूर रहमान यांच्या सिमेंटच्या व्यावसाय होता. त्यांच्या व्यवसायातून त्यांना चांगला नफाही मिळत होता. संसार आणि कुटुंबी अतिशय चांगलं सुरू होतं. कामा निमित्तानं 48 वर्षांपूर्वी हबीबूर सिलहटमधील बाजग्राम इथं गेले होते. मात्र तिथून हबीबूर घरी परतलेच नाही. त्यांना शोधण्याचा  कुटुंबीयांनी खुप प्रयत्न केला. मात्र ते सापडले नाही. त्यांच्या शोध घेऊन कुटुंबीय थकलं. ज्यावेळी हबीबूर गायब झाले होते. तेव्हा त्यांचं वय 30 वर्ष होतं.

फेसबुक व्हिडीओमुळं 48 वर्षानंतर भेट

गायब झालेले हबीबूर यांचा शोध त्यांच्या कुटुंबीयांनी हरप्रकारे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा शोध लागला नाही. त्यांचे मुलं मोठी झाली आणि व्यावसायासाठी अमेरिकेत स्थायिक झाली. त्यांचा मोठ्या मुलानं अमेरिकेत चांगला जम बसवला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी मोठा मुलाच्या बायकोच्या मोबाईलवर एक व्हिडीओ आला. त्या व्हिडीओतून बांगलादेशातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला आर्थिक मदत देण्याची विनंती करण्यात आली होती. तो व्हिडीओ पाहून मोठ्या मुलाच्या बायकोला शंका आली. त्यामुळं त्यांनी हा व्हिडीओ नवऱ्याला दाखवला. त्यानंतर त्यांनी हा व्हिडीओ ढाका इथं राहणाऱ्या भावांना पाठवून शोध घेण्यास सांगितलं. जेव्हा भाऊ हॉस्पिटलमध्ये पोहचले आणि त्यांनी रुग्णाला पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. कारण तो व्हिडीओ 48 वर्षांपूर्वी हरवलेल्या त्यांच्या वडिलांचाच असल्याचं स्पष्ट झालं होतं. सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पित्याला पाहून मुलाचं डोळे भरून आले. मुलानं पित्याला उपचारासाठी चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.  त्यांची पत्नी तर त्यांची वाट पाहून 2000 साली वारली होती.

1995 साली आजारी अवस्थेत सापडले

हबीबूर रहमान हे 1995 साली आजारी अवस्थेत हजरत शाहबुद्दीन दरगाह परिसरात होते.  बेगम कुटुंबीयांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करून उपचार केले. ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर बेगम यांच्या घरीच राहात होते.  रजिया बेगम ह्या  त्यांचा सांभाळ करत होत्या. गेल्या 25 वर्षांपासून ते मौलवी बाजार इथचं राहात असल्याचं समोर आलं आहे. पित्याची तब्बल 48 वर्षानंतर भेट झाल्यानंतर मुलाच्या चेहऱ्यावर आनंद होता. तसेच पित्याची भेट झाल्याबद्दल त्यानं अल्लाहचे आभार मानले.  हबीबूर हे कसे गायब झाले होते? गेली 48 वर्ष त्यांनी काय केलं? त्यांच्यासोबत काय झालं होतं? हे प्रश्न आता हळूहळू समोर येतील.

First published: January 19, 2020, 6:23 PM IST

ताज्या बातम्या