मुंबई, 28 मे : सरकारी जीवन विमा कंपनी LIC ने शुक्रवारी नवीन पॉलिसी (LIC New Policy) विमा रत्न (Bima Ratna) लाँच केली आहे. ही गॅरंटीड बोनससह मनी बॅक पॉलिसी आहे म्हणजेच मॅच्युरिटीवर किती बोनस मिळेल हे आधीच ठरवले जाते. साधारणपणे जीवन विमा पॉलिसींमध्ये, बोनस दरवर्षी निश्चित केला जातो. मात्र यामध्ये बोनस आधीच निश्चित करण्यात आला आहे. LIC विमा रत्नचा टेबल क्रमांक 864 आहे.
या पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रीमियम थोड्या कालावधीसाठी भरावा लागेल आणि तुम्हाला हमीसह बोनस मिळेल. या पॉलिसीमध्ये किमान 5 लाख रुपयांचा विमा असणे अनिवार्य आहे. ही गॅरंटीड बोनस पॉलिसी असल्याने, मॅच्युरिटीवर तुम्हाला किती बोनस मिळेल याचंही तुम्ही सहज कॅलक्युलेशन करू शकता.
तुम्हाला किती वार्षिक बोनस मिळेल?
एलआयसीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, 1 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत या पॉलिसीमध्ये प्रति 1000 रुपये वार्षिक 50 रुपये बोनस दिला जाईल. त्यानुसार, 5 लाख रुपयांच्या किमान विमा रकमेवर, पहिल्या 5 वर्षांसाठी 1,25,000 रुपये बोनस आहे. 6 ते 10 वर्षांसाठी 55 रुपये बोनस देण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार, पुढील 5 वर्षांसाठी बोनसची रक्कम 1,27,500 रुपये आहे. याचा अर्थ पहिल्या 10 वर्षांसाठी एकूण बोनसची रक्कम 2,52,500 रुपये आहे.
FD Rates : Fixed Deposit वर कोणती बँक देते सर्वात जास्त व्याज, पाहा यादी
मॅच्युरिटीपर्यंत एकूण किती रक्कम मिळेल?
LIC ने 10 वर्षांनंतर मॅच्युरिटी कालावधीपर्यंत वार्षिक 60 रुपये प्रति हजार बोनस जाहीर केला आहे. त्यानुसार, पुढील 5 वर्षांसाठी बोनसची रक्कम 1,50,000 रुपये होते. आता जर तुम्ही ही पॉलिसी 15 वर्षांच्या मुदतीसाठी घेतली असेल, तर किमान 5 लाख रुपयांचा विमा उतरवून तुम्हाला पॉलिसी मॅच्युरिटी होईपर्यंत एकूण 9,12,500 रुपये मिळतील. 15 व्या वर्षाच्या मुदतीत, 13व्या आणि 14व्या वर्षात, विमा रकमेच्या 25-25 टक्के रक्कम परत मिळेल. याचा अर्थ 13व्या वर्षी 1,25,000 रुपये आणि 14व्या वर्षीही तुम्हाला तेवढीच रक्कम मिळेल. उर्वरित 7,62,500 रुपये 15 व्या वर्षी पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर उपलब्ध होतील.
Axis Bank कडून Average monthly balance सह इतर सेवा शुल्कात वाढ, वाचा सविस्तर
त्याचप्रमाणे 20 वर्षांच्या मुदतीसह 5 लाख रुपयांचा एकूण विमा मिळून एकूण 10,62,500 रुपये मिळतील. तर 25 वर्षांच्या मुदतीवर ही रक्कम 12,12,500 रुपये होते. विमा रत्नमध्ये कमाल विमा रकमेवर मर्यादा नाही. 90 दिवस ते 55 वर्षे वयोगटातील ग्राहक ही पॉलिसी घेऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.