Home /News /money /

Axis Bank कडून Average monthly balance सह इतर सेवा शुल्कात वाढ, वाचा सविस्तर

Axis Bank कडून Average monthly balance सह इतर सेवा शुल्कात वाढ, वाचा सविस्तर

या सर्व फी आणि शुल्क कर वगळून आहेत. दरपत्रकात नमूद केलेल्या शुल्कांवर वस्तू आणि सेवा कर लागू होईल, असं अ‍ॅक्सिस बॅंकेनं परिपत्रकामध्ये म्हटलं आहे. आरबीआयने रेपो रेट 40 बेसिस पॉईंटने वाढवल्यानंतर काही दिवसांतच हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 27 मे : देशातील खासगी क्षेत्रातील आघाडीच्या अ‍ॅक्सिस बॅंकेने (Axis Bank) सेव्हिंग्ज आणि सॅलरी अकाउंट असलेल्या ग्राहकांसाठी बँकिंग आणि बिगर बॅंकिंग सेवा शुल्कात (Service Charges) नुकतेच बदल केले आहेत. त्यानुसार, अन्य गोष्टींसह अकाउंटमध्ये दरमहा किमान रक्कम शिल्लक न ठेवणाऱ्या ग्राहकांच्या सेवा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या नव्या नियमांपैकी काही नियम हे 1 जून 2022 पासून तर अन्य काही नियम 1जुलैपासून लागू होतील, असं अ‍ॅक्सिस बॅंकेने परिपत्रकात म्हटलं आहे. या सुविधांसाठी अ‍ॅक्सिस बॅंक 1 जूनपासून लागू करणार सुधारित सेवा शुल्क सरासरी मासिक शिल्लक (Average monthly balance) : प्राइम अँड लिबर्टी प्रोग्रॅमअंतर्गत सर्व सेव्हिंग्ज आणि सॅलरी अकाउंट्ससाठी सरासरी मासिक शिल्लक रकमेची मर्यादा वाढवण्यात आली आहे. निमशहरी भागांसाठी, 1 जूनपासून अकाउंटमधील सरासरी मासिक शिल्लक रकमेची मर्यादा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. अ‍ॅक्सिस बॅंकेनं ग्रामीण भागातल्या अकाउंटसाठीदेखील समान दराने वाढ केली असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. रक्कम शिल्लक न ठेवणाऱ्या अकाउंटसाठीचं मासिक शुल्क (Monthly Service Fee on Non- maintenance of Account Balance) : प्राइम, लिबर्टी, कृषी, शेतकरी, ज्येष्ठ विशेषाधिकार आणि प्रीमियम विभाग यांसारख्या डोमेस्टिक (Domestic) आणि अनिवासी (Non Resident) अकाउंट प्रकारांकरिता सुलभ आणि समतुल्य सेवा शुल्क लागू होईल. यासाठीचे मासिक सेवा शुल्क सरासरी मासिक शिल्लक आवश्यकतेच्या तुलनेत 7.5 टक्क्यांनी वाढले आहे. यासाठी किमान अट अ‍ॅक्सिस बॅंकेने काढून टाकली आहे आणि कमाल मर्यादा 500 रुपयांवरून 600 रुपये करण्यात आली आहे. मेट्रो आणि शहरी भागांकरिता 600 रुपये, निमशहरी भागाकरिता 300 रुपये आणि ग्रामीण भागाकरिता 250 रुपये मासिक शुल्क आकारण्यात येईल. या सुविधांसाठी अ‍ॅक्सिस बॅंक 1 जुलैपासून लागू करणार सुधारित सेवा शुल्क मोफत मासिक रोख व्यवहार मर्यादा (Monthly Cash Transaction Free Limit) : अ‍ॅक्सिस बॅंकेनं मासिक रोख व्यवहारांवरील फी रचनेत सुधारणा केली आहे. नवीन नियमानुसार, अ‍ॅक्सिस बॅंक अकाउंटमधून तुम्ही पहिली पाच ट्रान्झॅक्शन (Transactions) मोफत करू शकाल किंवा ती पूर्ण होण्याआधी खात्यातून 1.5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढली गेली तर पुढील प्रत्येक व्यवहारावर शुल्क आकारलं जाईल. या पूर्वी पहिली पाच ट्रान्झॅक्शन किंवा 2 लाख रुपयांपर्यंतची ट्रान्झॅक्शन यापैकी जी अट आधी पूर्ण होईल, तितकेच व्यवहार मोफत करता येतील, असा नियम होता. हा नवा नियम प्राइम आणि लिबर्टी अंतर्गत सर्व सेव्हिंग्ज अकाउंट प्रकारांसाठी लागू असेल. एनएसीएच डेबिट फेल्युअर (NACH Debit Failure) : यासाठी आता प्रतिव्यवहार 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. यापूर्वी पहिल्या व्यवहारासाठी 375 रुपये, दुसऱ्या व्यवहारासाठी 425 रुपये आणि तिसऱ्या व्यवहारासाठी 500 रुपये शुल्क आकारण्यात येत होतं. ऑटो डेबिट फेल्युअर आणि स्थायी सूचना नाकारण्याचं शुल्क (Auto Debit Failure and Standing Instructions Rejection Charges) : यासाठी आता 250 रुपये प्रतिव्यवहार असं शुल्क असेल. यापूर्वी हे शुल्क 200 रुपये प्रतिव्यवहार असं होतं. रोख ठेव व्यवहारावरील ट्रान्झॅक्शन चार्जेस : अ‍ॅक्सिस बॅंकेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, यासाठी आता बॅंकेच्या कामकाजाच्या तासांनंतर ( सायंकाळी 5 ते सकाळी 9.30 वाजेदरम्यान) आणि बॅंक किंवा राज्य सुट्टीच्यादिवशी अकाउंटमधून तुम्ही डिपॉझिटची दोनपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन केलीत किंवा त्या आधीच 5000 रुपये प्रतिमहिना (एक किंवा अनेक ट्रान्झॅक्शन) डिपॉझिट केले तर त्यासाठी 50 रुपये प्रतिट्रॅन्झॅक्शन असे शुल्क आकारले जाईल. चेक बुक चार्जेस (Cheque Book Charges) : अ‍ॅक्सिस बॅंकेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, फिजिकल स्टेटमेंट आणि डुप्लिकेट पासबुकचे शुल्क आता 75 रुपयांवरून 100 रुपये करण्यात आले आहे. अतिरिक्त चेकबुक शुल्क 2.5 रुपये प्रतिपानावरून 4 रुपये प्रतिपान करण्यात आले आहे. या सर्व फी आणि शुल्क कर वगळून आहेत. दरपत्रकात नमूद केलेल्या शुल्कांवर वस्तू आणि सेवा कर लागू होईल, असं अ‍ॅक्सिस बॅंकेनं परिपत्रकामध्ये म्हटलं आहे. आरबीआयने रेपो रेट 40 बेसिस पॉईंटने वाढवल्यानंतर काही दिवसांतच हा निर्णय घेण्यात आला आहे.

    First published:

    Tags: Axis Bank

    पुढील बातम्या