Home /News /money /

FD Rates : Fixed Deposit वर कोणती बँक देते सर्वात जास्त व्याज, पाहा यादी

FD Rates : Fixed Deposit वर कोणती बँक देते सर्वात जास्त व्याज, पाहा यादी

गुंतवणुकीचा सुरक्षित आणि सुलभ पर्याय म्हणून याकडे आवर्जून पाहिलं जातं. रिझर्व्ह बँकेकडून 4 मे 2022 रोजी रेपो दरात वाढ करण्यात आली. त्यामुळे सरकारी बँकांसह खासगी बँकांनीही एफडीवर दिल्या जाणाऱ्या व्याजदरात वाढ केली आहे.

    नवी दिल्ली, 27 मे : कोरोना काळानंतर सर्वांनाच गुंतवणुकीचं महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजलं आहे. सध्या म्युच्युअल फंड (Mutual Funds), आरडीसह गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातल्या काही योजनांत कमी कालावधीमध्ये चांगला परतावा मिळतो; पण तरीसुद्धा मुदत ठेवीकडे (एफडी) (Fixed Deposit) असणारा कल कमी झालेला नाही. गुंतवणुकीचा सुरक्षित आणि सुलभ पर्याय म्हणून याकडे आवर्जून पाहिलं जातं. रिझर्व्ह बँकेकडून 4 मे 2022 रोजी रेपो दरात वाढ करण्यात आली. त्यामुळे सरकारी बँकांसह खासगी बँकांनीही एफडीवर दिल्या जाणाऱ्या व्याजदरात वाढ केली आहे. त्याबद्दलचं वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिलं आहे. देशातली सर्वांत मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर 2.90 ते 6.30 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. खासगी बँकांमध्ये आयडीएफसी (IDFC) बँक 2.50 ते 6.75 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. आपण जमा करत असलेली रक्कम आणि ती आपण किती वर्षांसाठी गुंतवणार आहोत या घटकांवर एफडीवर मिळणारा व्याजदर अवलंबून असतो. आपल्याकडची मोठी रक्कम दीर्घ कालावधीसाठी ठेवणार असू, तर त्यातून मिळणारं व्याजही साहजिकच जास्त असेल. देशात सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर अधिक दराने व्याज दिलं जातं. एफडीमध्ये गुंतवणुकीचा विचार असल्यास देशातल्या महत्त्वाच्या बँकांमध्ये एफडीवर दिले जाणारे Latest व्याजदर किती आहेत, हे जाणून घेऊ या. एसबीआयकडून एफडीवर सर्वाधिक व्याजदर आजच्या घडीला एसबीआय ही सार्वजनिक क्षेत्रातली बँक एफडीवर सर्वाधिक व्याजदर देत आहे. Bankbazaar.com ने दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया सामान्य नागरिकांना 2.90 ते 5.50 टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना 3.40 ते 6.30 टक्के व्याजदर देत आहे. एचडीएफसी बँक सामान्य नागरिकांना 2.50 ते 5.60 टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना 3.30 ते 6.35 टक्के व्याजदर देत आहे. एफडीवर आयडीबीआय बँक 2.70 ते 5.60 टक्के व ज्येष्ठांना 3.20 ते 6.35 टक्के, पंजाब नॅशनल बँक सामान्यांना 3 ते 5.25 टक्के व ज्येष्ठांना 3.50 ते 5.75 टक्के, कॅनरा बँक सामान्यांना 2.90 ते 5.75 व ज्येष्ठांना 2.90 ते 6.25 टक्के, अ‍ॅक्सिस बँक सामान्यांना 2.50 ते 5.75 व ज्येष्ठांना 2.50 ते 6.50 टक्के, बँक ऑफ बडोदा सामान्यांना 2.80 ते 5.35 व ज्येष्ठांना 3.30 ते 6.35 टक्के, आयडीएफसी बँक सामान्यांना 2.50 ते 6.25 व ज्येष्ठांना 3 ते 6.75 टक्के, बँक ऑफ इंडिया सामान्यांना 2.85 ते 5.20 व ज्येष्ठांना 3.35 ते 5.95 टक्के आणि पंजाब अँड सिंध बँक सामान्य नागरिकांना 3 ते 5.40 टक्के व ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 5.90 टक्के दराने व्याज देत आहे.
    First published:

    Tags: SBI, Sbi fd rates, बँक

    पुढील बातम्या