Ind vs NZ: टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने 10 विकेटने जिंकला सामना

दुसर्‍या डावात भारताचा संपूर्ण संघ केवळ 191 धावांवर घसरला. अशाप्रकारे न्यूझीलंडला विजयासाठी अवघ्या 9 धावांचे लक्ष्य मिळाले, जे यजमान संघाने कोणत्याही पराभवाशिवाय मिळवले.

दुसर्‍या डावात भारताचा संपूर्ण संघ केवळ 191 धावांवर घसरला. अशाप्रकारे न्यूझीलंडला विजयासाठी अवघ्या 9 धावांचे लक्ष्य मिळाले, जे यजमान संघाने कोणत्याही पराभवाशिवाय मिळवले.

  • Share this:
    वेलिंग्टन, 24 फेब्रुवारी : भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यात 10 गडी राखून न्यूझीलंडने धुव्वा उडवला आहे. 2013 नंतर पहिल्यांदाच भारताला कसोटी सामन्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात न्यूझीलंडसमोर केवळ 9 धावांचं आव्हान होतं. ते  आव्हान न्यूझीलंडने अगदी सहज पूर्ण केलं. NZ  विरूद्ध तिसरा मोठा पराभव दुसर्‍या डावात भारताचा संपूर्ण संघ केवळ 191 धावांवर घसरला. अशाप्रकारे न्यूझीलंडला विजयासाठी अवघ्या 9 धावांचे लक्ष्य मिळाले, जे यजमान संघाने कोणत्याही पराभवाशिवाय मिळवले. न्यूझीलंडचा 10 विकेटने हा पाचवा आणि कसोटी क्रिकेटमधील भारताविरुद्धचा तिसरा विजय आहे. तर 2013 नंतर विकेटच्या बाबतीत हा सर्वात मोठा विकेट आहे. भारत याआधी 2013मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हातून हारला होता. 2019 मध्ये एकही कसोटी न गमावणाऱ्या टीम इंडियाने 2020मध्ये आपला पहिला कसोटी सामना गमावला आणि तोदेखील 10 गडी राखून पराभूत झाला. या अर्थाने हा सामना जागतिक क्रमांकाच्या भारतासाठीही निराशाजनक होता. 2 सामन्यांच्या मालिकेत भारताचा 0-1 असा पराभव झाला आहे. 79 मिनिटांत डाव कोसळला आजच्या खेळात भारतीय डाव अवघ्या 79 मिनिटांमध्ये आवरला आणि त्यांचे फलंदाज बाद झाले. भारतीय डावात मयंक अग्रवालने सर्वाधिक 58 धावा केल्या. याशिवाय अजिंक्य रहाणेने 29 आणि ऋषभ पंतने 25 धावा केल्या. इशांत शर्माबरोबर आठव्या विकेटसाठी 27 धावांची भागीदारी केली. चौथ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात झाल्यावर अजिंक्य राहणे आणि हनुमा विहारीने सामना पुढे नेत 4 धावांची भर घातल्यानंतर या दोघांची जोडी तुटली. रहाणेने त्याच्या धावांमध्ये 4 धावा केल्या तर हनुमा विहारी (15) त्याच्या धावांमध्ये आणखी एकही धावा जोडू शकला नाही. रहाणे आणि हनुमा विहारी यांनी 35 धावांची भागीदारी केली. याआधी पहिल्या डावात भारताला 165 धावा देऊन बाद करून न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाची सुरुवात 5 विकेट्सच्या नुकसानावर 216 धावा केल्या आणि पहिल्या सत्रात 348 धावांच्या मोबदल्यात 123 धावांची भर घातली. भारतावर 183 धावांची मोठी आघाडी घेतली. मयंक अग्रवालने दाखवला दम तिसऱ्या दिवशी दुसरी डाव सुरू केल्यानंतर भारतीय संघाचा जर कोणी गोलंदाज कमाल करू शकला तर तो सलामी गोलंदाज मयंक अग्रवाह आहे. ज्याने 58 धावांवर खेळ रंगवला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बाऊल्टने पृथ्वी शॉ (14), चेतेश्वर पुजारा (11) आणि कर्णधार विराट कोहली (19) यांना सहज बाद करत पाहुण्या संघाला अडचणीत आणलं. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी किवी संघाला पाचवा विकेट घेण्यास परवानगी दिली नाही, ही गोष्ट भारतासाठी एक दिलासादायक बाब ठरली.
    First published: