पाकिस्तानी रेहान सिद्दीकीवर अखेर बंदी, शिवसेना खासदाराच्या पाठपुराव्याला यश

पाकिस्तानी रेहान सिद्दीकीवर अखेर बंदी, शिवसेना खासदाराच्या पाठपुराव्याला यश

अमेरिकेत बॉलिवूड इव्हेंट आयोजित करून आयएसआयला पैसे पुरवणाऱ्या रेहान सिद्दीकी आणि त्याच्या साथीदारांवर केंद्रीय गृह मंत्रालयाने अखेर बंदी घातली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै: अमेरिकेत बॉलिवूड इव्हेंट आयोजित करून आयएसआयला पैसे पुरवणाऱ्या रेहान सिद्दीकी आणि त्याच्या साथीदारांवर केंद्रीय गृह मंत्रालयाने अखेर बंदी घातली आहे. बॉलिवूड इव्हेंटच्या नावाखाली भारताविरोधी कारवाया करणाऱ्या या टोळीच्या विरोधात गेल्या तीन वर्षांपासून आवाज उठणाऱ्या शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी पत्र पाठवून केंद्रीय गृह मंत्रालयाने या कारवाईची माहिती दिली होती.

हेही वाचा... शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही? राऊतांचा सवाल

आयएसआयला आर्थिक मदत करणाऱ्या रेहान सिद्दीकीच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावणाऱ्या बड्या बॉलिवूड कलाकारांची सक्तवसुली संचालनालय (ED)आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA)मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी आता लावून धरली आहे.

ह्युस्टन, अमेरिका येथून प्राप्त झालेल्या तक्रारी आणि कागदपत्रांच्या आधारे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी सुमारे 3 वर्षांपूर्वी तत्कालीन परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे तक्रार दाखल केली. अमेरिकेत बॉलिवूड इव्हेंट आयोजित करणारा पाकिस्तानी रेहान सिद्दीकी हा भारतविरोधी कारवायांसाठी आयएसआय या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत करत असल्याची माहिती या तक्रारीत करण्यात आली होती. तसेच सिद्दीकीच्या रेडिओ चॅनल, सोशल मीडिया या मार्फ़त होणारा भारतविरोधी प्रचार याचीही माहिती देण्यात आली.

रेहान सिद्दीकीसह राकेश कौशल आणि दर्शन मेहता यांच्यावर बंदी घालून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खासदार शेवाळे यांनी केली होती. या संदर्भात केंद्रीय मंत्री जनरल व्ही के सिंग यांची भेट घेतल्यावर ह्युस्टन येथील हायकमिशन ला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, फेब्रुवारी 2020 मध्ये खासदार शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांना या प्रकरणी पत्र लिहून कारवाईची मागणी केली. या पत्राची दखल घेऊन, केंद्र सरकारने, ह्युस्टन येथील काँस्युलेट जनरल ऑफ इंडिया यांना चौकशीचे आदेश दिले. या चौकशीनंतर, रेहान सिद्दीकी आणि त्याच्या साथीदारांचा भारत विरोधी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.

यासंदर्भातील अहवाल पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्रालायला सोपविण्यात आला. अखेर केंद्रीय गृह मंत्रालयाने सिद्दीकी आणि त्याच्या साथीदारांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले. तसेच, वॉशिंग्टन मधील भारतीय दुतावासाने भारतीय कलाकारांना, रेहान सिद्दीकी, राकेश कौशल आणि दर्शन मेहता यांच्या कार्यक्रमांमध्ये सामील न होण्याच्या सूचना दिल्या आहेत. याविषयीची माहिती केंद्रीय गृह राज्य मंत्री श्री जी किशन रेड्डी यांनी पत्राद्वारे खासदार राहुल शेवाळे यांना 28 जून 2020 रोजी कळविली.

हेही वाचा...हिंदू बायकोमुळे पाकिस्तानचा 'हा' गोलंदाज झाला दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू!

'माझ्या तक्रारीची दखल घेत केंद्र सरकारने केलेल्या कारवाईबाबत मी गृहमंत्री अमित शहा आणि केंद्र सरकारचा आभारी आहे. गेल्या 3 वर्षांत ज्या ज्या बॉलिवूड कलाकारांनी रेहान सिद्दीकी आणि त्याच्याशी संबंधित परदेशातील कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला असेल त्यांची सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा ( एनआयए) मार्फत कसून चौकशी व्हायला हवी. यामुळे देशहित हे आपल्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे, हा संदेश पोहोचू शकेल, असं शिवसेना खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी सांगितलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 23, 2020, 2:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या