मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही? संजय राऊतांचा सवाल

शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही? संजय राऊतांचा सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर साक्षात त्यांच्या वारसांवरच आक्षेप घेतल्यामुळे जगभरातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर साक्षात त्यांच्या वारसांवरच आक्षेप घेतल्यामुळे जगभरातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर साक्षात त्यांच्या वारसांवरच आक्षेप घेतल्यामुळे जगभरातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला आहे.

मुंबई, 23 जुलै: संसदेत बुधवारी (22 जुलै) राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली. त्यात साताऱ्याचे भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांच्यासह महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी, राजीव सातव आणि भागवत कराड यांनी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली होती. मात्र, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणेवर आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर साक्षात त्यांच्या वारसांवरच आक्षेप घेतल्यामुळे जगभरातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला आहे. त्यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत भाजपवर सणसणीत टीका केली आहे. हेही वाचा...ईस्टर बॉम्बस्फोटातील IS दहशतवाद्याची पत्नी भारतात, श्रीलंका पोलिसांचा मोठा खुलासा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? असा सवाल करत भाजपचे या विषयांवर 'तोंड बंद' आंदोलन सुरू झालं आहे. तर दुसरीकडे संभाजी भिडे यांच्याकडून सांगली आणि सातारा जिल्हा बंदची घोषणा अद्याप झालेली नाही..., असं म्हणत संजय राऊतांनी भाजप आणि समर्थकांना जाब विचारला आहे. काय आहे संजय राऊत यांचं ट्वीट? नेमकं काय झालं होतं राज्यसभेत... राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये बुधवारी नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पाडला. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे मोजक्यात सदस्यांना शपथ देण्यात आली. महाराष्ट्रातून सर्वात आधी सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेची शपथ घेतली. विशेष म्हणजे रामदास आठवले यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली. उदयनराजेंनीही इंग्रजीतून शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी...जय शिवाजी' असा जयघोष करत शपथ पूर्ण केली होती. उदयनराजे भोसले यांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ, पूर्ण VIDEO उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप नोंदवला. 'हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही आहे, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजेंनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी', अशी सूचनाही व्यंकय्या नायडू यांनी यावेळी केली होती.
First published:

Tags: Sanjay raut, Shiv sena, Udayan raje bhosle

पुढील बातम्या