दक्षिण आफ्रिकी संघाला एकहाती सामना जिंकून देणारा अनुभवी गोलंदाज इमरान ताहिरचा जन्म लाहोरमध्ये झाला.
मात्र ताहिरला पाकिस्तानकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. ताहिरने सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. मात्र त्याला आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळाले नाही.
पाकिस्तानमध्ये त्याला क्रिकेट खेळण्याची संधी न मिळाल्यामुळे ताहीर दक्षिण आफ्रिकेला निघून गेला. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाकडून ताहिरला आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळाले.
मात्र ताहिरने नुकत्याच एका मुलाखतीत पाककडून क्रिकेट खेळण्याची खूप इच्छा होती. संधी मिळाल्याचे दु:ख आजही आहे, असे सांगितले.
दक्षिण आफ्रिकेला जाण्याआधी 41 वर्षीय ताहिरने पाकिस्तानकडून अंडर-19 आणि पाकिस्तान अ संघाकडून खेळला होता. मात्र पत्नीच्या सांगण्यावरून त्याला पाकिस्तान सोडावे लागले.
ताहिरने सांगितले की, तो काळ कठिण होता. मात्र दक्षिण आफ्रिका संघाकडून खेळण्याची मला जी संधी मिळाली त्याचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या पत्नीला जाते. मुख्य म्हणजे ताहिरची पत्नी सुमाया हिंदू आहे.
ताहिरने दक्षिण आफ्रिका संघाकडून 20 कसोटी, 107 एकदिवसीय आणि 38 टी-20 सामने खेळले आहेत. ताहिरने गेल्या वर्षी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.