संभाजी मालिकेत या आठवड्यात येणार 'तो' क्षण

संभाजी मालिकेत या आठवड्यात येणार 'तो' क्षण

Swarajyarakshak Sambhaji, Marathi Serial - 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत आतापर्यंत अनाजी पंतांच्या सर्व कारवाया समोर आल्यात.

  • Share this:

मुंबई, 24 जून : सगळे प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पहात होते, तो क्षण या आठवड्यात छोट्या पडद्यावर येणार. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत आतापर्यंत अनाजी पंतांच्या सर्व कारवाया समोर आल्यात. अनाजी पंत आणि मंत्रिमंडळानं रायगडावरून पळ काढलाय. त्यांना पकडायला सैन्य निघालं पकडायला वेळ लागला खरा, पण सगळे पकडले गेले.

संभाजी महाराज रायगडावर पोचलेत. सोयरा मातोश्रींसमोर त्यांनी आपला सगळा राग व्यक्त केला. या कारस्थानाला कळत नकळत मातोश्रींचा हातभार लागला होता, याची जाणीवही शंभूराजेंना झालीय. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत इतिहासच समोर उभा राहतो. या आठवड्यात अनाजी पंत आणि सर्व कारभाऱ्यांना शंभूराजेंसमोर उभं केलं जातं. आणि प्रेक्षक ज्याची वाट पहात होते, ते या आठवड्यात घडतं. अनाजी पंतांना हत्तीच्या पायाखाली द्या, असं फर्मान या आठवड्यात निघणार आहे. हा न्यायनिवाडा सोयरा मातोश्रींकडून शंभूराजे वदवून घेणार.

...म्हणून अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटो काढल्यावर ट्रोल झाल्या जया

असं बरंच मोठं नाट्य या आठवड्यात घडणार आहे. अनाजी पंत या व्यक्तिरेखेचा लोकांनी खूप राग केला आणि तेच ती साकारणाऱ्या अभिनेत्याचं यश आहे. अनाजी पंतांची भूमिका करणारे महेश कोकाटे हे नाटकातले. त्यांनी रंगभूमीवर बऱ्याच नाटकात काम केलंय. मंगलगाणी दंगलगाणी, महाराष्ट्र की लोकधारा, आवाज की दुनिया, जाणता राजा या शोजमध्ये त्यांचा सहभाग होता.

विद्याधर जोशींची घरातून एक्झिट, जाताना या स्पर्धकाला दिलं जीवनदान

महेश कोकाटेंनी नाटकंही खूप केलीयत. त्यात टुरटुर, भरत जाधवचं मोरूची मावशी, मालवणी, मराठी आणि गुजराती भाषेतलं आॅल द बेस्ट 3, शंभूराजे अशी बरीच नाटकं त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी हिंदी मालिकांमध्येही काम केलंय. आर.के. लक्ष्मण की दुनिया, दिल तो कच्चा है जी, श्रीमान श्रीमती रिटर्न्स अशा मालिकांमध्ये त्यांच्या भूमिका होत्या.

'या' सिनेमातून शाहरुखसोबत पुन्हा एकदा दिसणार श्रेयस तळपदे

याशिवाय त्यांनी मराठी सिनेमेही केलेत. खतरनाक, पछाडलेला, अगडबंब, अगडबंब 2, टाइम बरा वाईट, गुरू, नो प्राॅब्लेम असे सिनेमे त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी गुजराती नाटकातही काम केलंय.

या आठवड्यात त्यांची अनाजी पंतांची भूमिका संपणार. पण प्रेक्षकांच्या ती कायम स्मरणात राहील.

'पिवळी साडीवाली' अधिकारी महिलेच्या डान्सचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 05:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading