जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'या' सिनेमातून शाहरुखसोबत पुन्हा एकदा दिसणार श्रेयस तळपदे

'या' सिनेमातून शाहरुखसोबत पुन्हा एकदा दिसणार श्रेयस तळपदे

'या' सिनेमातून शाहरुखसोबत पुन्हा एकदा दिसणार श्रेयस तळपदे

shahrukh khan shreyas talpade डिझनीच्या या लाइव्ह अक्शन सिनेमाच्या हिंदी व्हर्जनसाठी अजून अनेक बॉलिवूड कलाकारांचा आवाज वापरला जाणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 जून- शाहरुख खान आणि त्याचा मोठा मुलगा आर्यन खान दोघंही द लायन किंग सिनेमासाठी डबिंग करणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. डिझनीच्या या लाइव्ह अक्शन सिनेमाच्या हिंदी व्हर्जनसाठी अजून अनेक बॉलिवूड कलाकारांचा आवाज वापरला जाणार आहे. यात आशीष विद्यार्थी, श्रेयस तळपदे, संजय मिश्रा आणि असरानी यांची एण्ट्री झाली आहे. MeTooप्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर नाना पाटेकरांच्या ‘नाम’वर तिने उठवले प्रश्न

जाहिरात

Bigg Boss Marathi 2- शिव म्हणजे तर घरात सोडलेला वळूच- महेश मांजरेकर शाहरुख खान आणि आर्यन दोघं सिनेमातील मुफासा आणि सिंबा या दोन मुख्य व्यक्तिरेखांना आवाज देणार आहेत तर आशीष खलनायक स्कार, श्रेयस- टिमोन, संजय पुंबा आणि असरानी हे जाजूसाठी आवाज देणार आहेत. सिनेमाची कथा सिंहांचा राजा आणि त्याच्या मुलावर आधारित आहे. याचा मूळ सिनेमा १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. भारतात हा सिनेमा इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत १९ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

जाहिरात

अभिनेत्रीने साजरा केला जुळ्या मुलींचा पहिला वाढदिवस या सिनेमातून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. द लायन किंग या हॉलिवूड सिनेमातील सिंबा या व्यक्तिरेखेसाठी तो आवाज देणार आहे. तर शाहरुख मुफासा या सिंहाच्या राजाला आवाज देणार आहे. स्वतः शाहरुखने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून याबद्दल माहिती दिली होती. VIDEO : बिचुकलेचं पितळ उघडं, आणखी एका गुन्ह्यात अडकला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात