मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Pandharpur Nagar Parishad : पंढरपूर नगरपरिषदेत सावळा गोंधळ, विकासकाला मोफत जमीन देऊनही नागरिकांना घरे नाहीत

Pandharpur Nagar Parishad : पंढरपूर नगरपरिषदेत सावळा गोंधळ, विकासकाला मोफत जमीन देऊनही नागरिकांना घरे नाहीत

बेघर लोकांना कायमस्वरूपी निवारा मिळावा यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून पंढरपूर नगरपालिकेच्या जागेत सुमारे चार हजार घरांचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरु आहे. (Pandharpur Nagar Parishad)

  पंढरपूर, 19 ऑगस्ट : बेघर लोकांना कायमस्वरूपी निवारा मिळावा यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून पंढरपूर नगरपालिकेच्या जागेत सुमारे चार हजार घरांचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरु आहे. (Pandharpur Nagar Parishad) परंतु मागील दोन वर्षापासून या प्रकल्पाचे काम बंद आहे. घरासाठी पैसे भरून ही  वेळेवर घर मिळत नसल्याने लाभार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकल्प उभारणीच्या कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून याची चौकशी करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

  प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळेल या आशेने शहरातील अनेक गोरगरीब लाभार्थांनी या योजनेत लाखो रुपये गुंतवले आहेत. ही योजना सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. दरम्यान मागील दोन वर्षापासून या गृह प्रकल्पाचे काम रेंगाळले आहे. दोन वर्षानंतरही घर मिळत नसल्याे या प्रकल्पाविषयी साशंकता निर्माण झाली आहे.

  हे ही वाचा : आता पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार देवेंद्र फडणवीस? ब्राह्मण महासंघाचं केंद्राला पत्र

  शहरातील सुमारे शेकडो लोकांनी व्याजांनी पैसे काढून या प्रकल्पामध्ये गुंतवले आहेत.दरम्यान ही योजना बंद आहे.त्यामुळे लाभार्थींना नाहक बॅंकांचा आणि खासगी सावकारांचा व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. सुरुवातीला एका घराची किंमत ही 4 लाख 50 हजार इतकी सांगण्यात आली होती. त्यानंतर त्यात वा़ढ करुन ती 5 लाख 95 हजार इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे गोरगरीबांचे घरांचे स्वप्न दुभंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

   हे ही वाचा : 'नितीन गडकरींसोबत तेच घडलं..'; संसदीय बोर्डातून वगळण्याचं कारण सांगत काँग्रेसचा भाजपवर निशाणा

  अशातच प्रकल्पाचे काम रेंगाळल्यामुळे अनेक बॅंकांनी मंजूर केलेली कर्ज प्रकरणे रद्द केली आहेत. त्याचाही फटका लाभार्थींना बसला आहे. येत्या पंधरा दिवसात प्रकल्पाचे काम सुरु करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

  पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी आवास योजनेबद्दल माहिती देताना सांगितले की, प्रोजेक्टच्या किंमतीत जागेची किंमत धरली नसली तरी नागरिकांकडून या उपक्रमाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. विकासकाला 22 कोटी देणे बाकी असल्याने 85 टक्के वसाहतीचे काम होऊनही काम थांबवावे लागले आहे. सोलापूर येथील प्रधानमंत्री आवास योजनतील सदनिकेची किंमत पंढरपूर येथील सदनिकेची किंमती पेक्ष्या कमी असण्याचे कारण पंढरपूर वसाहतीमध्ये जास्त अॅमेनीटज देण्यात आल्या आहेत. लवकरच या नोडल एजन्सीच्या अंतर्गत सदनिकेची किंमत स्वस्त करण्याचा प्रयत्न चालू आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Pandharpur, Pandharpur (City/Town/Village), Pandharpur news, Vitthal mandir pandharpur

  पुढील बातम्या