मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आता पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार देवेंद्र फडणवीस? ब्राह्मण महासंघाचं केंद्राला पत्र

आता पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार देवेंद्र फडणवीस? ब्राह्मण महासंघाचं केंद्राला पत्र

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुण्यातून खासदारकी द्या, असं यामध्ये म्हणण्यात आलं आहे

पुणे 19 ऑगस्ट : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून खासदारकी द्या, असं यामध्ये म्हणण्यात आलं आहे. प्रत्येक वेळी अखिल भारतीय महासंघ पुण्यात भाजपच्या मागे ठामपणे उभा आहे. त्यामुळे 2024 ला देखील देवेंद्र फडणवीस यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं आश्वासन त्यांनी पत्रात दिलं आहे. Shiv sena Tejas Thackeray : तेजस उद्धव ठाकरे, ठाकरे घराण्यातील युवाशक्तीचा नवा चेहरा, पोश्टर झळकले तुम्ही फडणवीस यांची संसदीय बोर्डात जी निवड केली आहे ती अतिशय सार्थ असून दिल्लीतल्या राजकारणाची फडणीस यांची सुरुवात पुण्यातून हवी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना हे पत्र पाठवलं आहे. मात्र, ही मागणी भाजपचं केंद्रीय नेतृत्त्व मान्य करणार की नाही, हे आगामी काळातच स्पष्ट होईल. 'मी दोषी नाही, माझ्यावरील आरोप खोटे'; 'त्या' प्रकरणावरील सुनावणीदरम्यान संजय राऊतांचा दावा पत्रात काय म्हटलंय - ब्राह्मण महासंघाने या पत्रामध्ये म्हटलं की देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कुशल राजकीय व्यक्तीमत्व आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी हे वेळोवेळी सिद्ध करून दाखवलं आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजपचं भविष्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपला सक्षम नेतृत्त्व देऊ शकणाऱ्या नेत्यांमध्ये जी दोन-तीन नावं आहेत त्यात देवेंद्र फडणवीस यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. महिन्याभरापूर्वी त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास भाग पाडण्यात आलं. त्यावेळी फडणवीस यांना एक पाऊल मागे यावं लागलं असलं तरी हा प्रारंभ आहे. भाजपचा हा निर्णय योग्य मानला जाऊ शकतो, असं यात म्हटलं आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Devendra Fadnavis

पुढील बातम्या