मुंबई 19 ऑगस्ट : नुकतंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाच्या संसदीय आणि निवडणूक समितीच्या नावाची घोषणा केली आहे. संसदीय समिती आणि निवडणूक समितीमधून नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचं नाव वगळण्यात आलं आहे. तर देवेंद्र यांचा समावेश निवडणूक समितीमध्ये करण्यात आला. यावरुन आता काँग्रेसने प्रश्न उपस्थित करत भाजपवर टीका केली आहे. संजय राऊत वापरायचे या बिल्डरच्या लक्झरी कार; ED तपासात मोठी माहिती समोर गडकरींच्या कामाचं राजकीय वर्तुळात नेहमीच कौतुक होत असतं. मात्र, तरीही भाजपने त्यांनाच वगळण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यावरुनच आता काँग्रेसने गडकरींचा व्हिडिओ शेअर करत याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं, की जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नितीन गडकरींसोबत हेच घडलं आहे.
जो प्रधानमंत्री का प्रतिद्वंद्वी होगा, उसको बाहर का रास्ता दिखा दिया जाएगा।
— Congress (@INCIndia) August 18, 2022
यही हुआ है नितिन गडकरी के साथ। pic.twitter.com/eRJX5hoHGD
काँग्रेसने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नितीन गडकरी सध्याच्या राजकारणाबाबत बोलताना दिसतात. यात गडकरी म्हणाले होते, अनेकदा मला असं वाटतं की राजकारण सोडून द्यावं. महात्मा गांधींच्या वेळी राजकारण वेगळं होतं. तेव्हा देश, समाज आणि विकासासाठी राजकारण व्हायचं. मात्र आता फक्त सत्तेसाठी राजकारण सुरू आहे. आपण यातला फरक ओळखायला हवा, असंही गडकरी म्हणाले होते. ‘ते पुन्हा येणार’! शिंदे सरकार महाराष्ट्रातील CBI वरील बंदी उठवण्याच्या तयारीत काँग्रेसने हा व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदींना सवाल केला आहे, की नितीन गडकरींना तुम्ही खरं बोलण्याची शिक्षा दिली आहे का? पंतप्रधानपदाच्या दावेदारीमुळेच गडकरींना वगळण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.