चिअर्स! राज्यात कोरोनाचा हाहाकार मात्र मुंबईच्या या स्पॉटवर तळीरामांच्या पार्ट्या सुरूच

चिअर्स! राज्यात कोरोनाचा हाहाकार मात्र मुंबईच्या या स्पॉटवर तळीरामांच्या पार्ट्या सुरूच

शासनाचे आदेश झुगारून डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरातून काही पर्यटक दारूच्या पार्ट्या कारण्यासाठी ग्रामीण भागात येताना दिसतायत.

  • Share this:

कल्याण, 22 जून : पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना वेध लागतात पर्यटन स्थळाचे. असंच एक नयनरम्य ठिकाण म्हणजे मलंगगड. मात्र यंदा देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. त्यामुळे गेल्या 4 महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. अशात सर्व पर्यटन स्थळं बंद करण्यात आली आहेत. पण तरीदेखील शासनाचे आदेश झुगारून डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरातून काही पर्यटक दारूच्या पार्ट्या कारण्यासाठी ग्रामीण भागात येताना दिसतायत.

या तळीरामांना आवर घालण्यासाठी पोलिसांची कुमक कमी पडत असल्याने तळीरामांच अधिक फावत आहे. त्यामुळे रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांवर बंदी आणण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

भाजपमध्ये डॅमेज कंट्रोल सुरू, येत्या 15 दिवसांत या नावांना मिळणार मोठी जबाबदारी

पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आंनद लुटण्यासाठी पर्यटक कल्याणजवळील मलंगगडाच्या कुशीत असलेल्या डोंगरांवर येत असतात. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पर्यटकांना ग्रामीण भागात मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांना अंधारात ठेऊन पर्यटक नव्या मार्गाने मलंगगडच्या डोंगराळ भागात प्रवेश करत आहेत आणि मलंगगड रोड लागून असलेल्या डोंगरांवर पार्ट्या करायला पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.

पिपंरी चिंचवड हादरलं! दोन दिवस मित्राला डिझेलनं झाळलं, तुकडे करून फेकलं नदीत

ठाण्याचे जिल्ह्यातील राजेश नार्वेकर यांनी पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. या संबंधीचे आदेशदेखील जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार पोलीस यंत्रणांनी देखील पर्यटकांना बंदी केली आहे. मात्र पोलिसांची पाठ वळतात पर्यटक पुन्हा डोंगरांवर येतात. मागील काही दिवसांपासून दिसतील त्या पर्यटकांना पोलिसांकडून फटके देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मार खाऊनदेखील पर्यटक आपली मौज मजा करायला मलंगगड भागातच येत आहेत.

पर्यटकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलनं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे जर प्रशासनाने वेळीच "ऍक्शन मोड" हाती घेतल्यास ग्रामीण भागाचा कोरोनापासून बचाव होऊ शकेल.

मोठी बातमी, केडीएमसी आणि कोल्हापूर पालिकेच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची घोषणा

संपादन - रेणुका धायबर

First published: June 22, 2020, 11:29 AM IST
Tags:

ताज्या बातम्या