जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पिपंरी चिंचवड हादरलं! दोन दिवस मित्राला डिझेलनं जाळलं, तुकडे करून फेकलं नदीत

पिपंरी चिंचवड हादरलं! दोन दिवस मित्राला डिझेलनं जाळलं, तुकडे करून फेकलं नदीत

पिपंरी चिंचवड हादरलं! दोन दिवस मित्राला डिझेलनं जाळलं, तुकडे करून फेकलं नदीत

क्रूरतेची सीमा गाठणारी गुन्ह्याची एक गंभीर बातमी पिंपरी चिंचवड शहरात समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पिंपरी चिंचवड, 22 जून : क्रूरतेची सीमा गाठणारी गुन्ह्याची एक गंभीर बातमी पिंपरी चिंचवड शहरात समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात तरूणाचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह डिझेल टाकून जाळला आणि मृतदेहाचे उर्वरित अवशेष नदीत टाकले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून एका छोट्या माहितीवरून पिंपरी पोलिसांनी या खुनाचा तपास लावत चौघांना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत बिल्लू ऊर्फ विक्की ऊर्फ जसबीर सिंग विरदी या एकोणविस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर बिल्लूचा खून केल्या प्रकरणी त्याच्याच ओळखीच्या असलेल्या नीरज जांगयानी, ललित ठाकूर , योगेश पंजवानी आणि हरज्योत सिंग लोहीट या चोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 मार्च 2020 रोजी आरोपी आणि मयत बिल्लू यांची भांडणं झाली होती. मयत बिल्लू आणि आरोपी आणि त्याच्या भावाने आरोपी नीरज याला मारहाण केली होती. तसंच आरोपीला काचेची बाटली फोडून मारली होती. मात्र, त्याच दिवशी आरोपी आणि मयत हे एकत्र आले त्यांनी एकमेकांची माफी मागितली. खरंतर तेव्हा त्यांच्या वादावर पडदा पडला होता. मात्र, त्यानंतर रात्री ते पुन्हा नशा करण्यासाठी एकत्र बसले. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा भांडण झालं. यावेळी चिडलेल्या आरोपीने बिल्लू याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पिंपरीतील डेअरी फार्मजवळ नेऊन डिझेल टाकून जाळून टाकला. गंभीर म्हणजे मृतदेह पुर्णपणे जळाला नाही हे लक्षात आल्यावर, दुसऱ्या दिवशी पुन्हा येऊन त्यांनी डिझेल टाकून तो मृतदेह जाळला. मृतदेहाचे उर्वरित अवशेष आणि हाडं दापोडी इथल्या नदीपात्रात टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दोन दिवसानंतरही मुलगा घरी आला नसल्याने बिल्लूच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल केली. रविवारी दुपारी पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांना या खूनासंदर्भात गोपनीय माहिती मिळाली. हद्दीतून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा खून करून मृतदेह डेअरी फार्मजवळ जाळून टाकल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता त्या ठिकाणी काहीतरी जाळल्याचं दिसून आलं. संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली असता, चारही संशयितांना ताब्यात पोलिसांनी ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र, पोलिशी खाकी दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आता या प्रकरणाबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत. संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात