मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /बँक FD, PF, PPF, SIP, NPS मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे, कधीपर्यंत होतील पैसे तिप्पट?

बँक FD, PF, PPF, SIP, NPS मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे, कधीपर्यंत होतील पैसे तिप्पट?

जर तुम्ही Bank FD, PF, PPF, SIP, NPS आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर जाणून घ्या तुमचे पैसे कसे ट्रिपल होतील

जर तुम्ही Bank FD, PF, PPF, SIP, NPS आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर जाणून घ्या तुमचे पैसे कसे ट्रिपल होतील

जर तुम्ही Bank FD, PF, PPF, SIP, NPS आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर जाणून घ्या तुमचे पैसे कसे ट्रिपल होतील

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट: सध्या गुंतवणुकीला (Investment schemes) विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. अनेकदा पैसे कसे दुप्पट होतील, कधीपर्यंत दुप्पट होतील असा सवाल अनेकांना पडलेला असतो. तुम्ही जर व्यवस्थित ठिकाणी गुंतवणूक केली तर काही वर्षात रिटर्न चांगला मिळू शकतो. चक्रवाढ व्याजामुळे ही गुंतवणूक दुप्पट किंवा तिप्पट देखील होऊ शकते. जर तुम्ही कोणत्याही बँकेत एफडी (FD) केली आहे, किंवा पीएफ (PF), पीपीएफ (PPF), एनपीएस (NPS) आणि म्युच्युअल फंड (Mutual Fund) मध्ये गुंतवणूक करत असाल किंवा करणार असाल तर तुम्ही तुमचे पैसे दुप्पट किंवा तिप्पट करू शकता.

कधीपर्यंत होतील पैसे दुप्पट?

पैशांची वृद्धी होण्यास वास्तवत: किती वेळ जाईल याचा अंदाज असत नाही. अंदाज बांधून केलेलं कॅलक्यूलेशन पूर्णपणे बरोबर देखील असत नाबी. मात्र तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या रिटर्नचा साधारण अंदाज येऊ शकतो. 72 चा नियम आणि 114 चा नियम (Rule of 72 and Rule of 114) वापरुन तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमचे पैसे किती वेगाने वाढू शकतील. योग्य पद्धतीने या नियमाचा उपयोग केल्यास तुम्हाला याबाबत अंदाज बांधता येईल.

हे वाचा-आता फक्त मासोळ्या पाळण्याचा व्यवसाय करा आणि महिन्याला कमवा तब्बल 2 लाख रुपये

काय आहे 72 चा नियम

72 चा नियम (Rule of 72) तुम्हाला याबाबत माहिती देईल की तुमचे पैसे किती वर्षात दुप्पट होतील. याचा एक साधा सरळ फॉर्म्युला आहे. जो तुम्हाला सांगेल की तुमचे पैसे कधी दुप्पट होतील. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्कीमच्या व्याजदराने 72 ला विभाजित करा. याकरता रेट ऑफ रिटर्नचा एक विशेष दर असला पाहिजे. तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी लागणारी वर्ष=72/रेट ऑफ रिटर्न.

हे वाचा-PPF मध्ये दरमहा गुंतवा 1000 रुपये आणि मिळवा 18 लाखांचा रिटर्न, वाचा कशाप्रकारे?

कसे होतील पैसे तिप्पट?

तुम्हाला तुमचे पैसे तिप्पट कसे होतील (How to Triple my Money?) हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला 114 चा नियमाचा  (Rule of 114) उपयोग केला पाहिजे. हा नियम देखील 72 च्या नियमासारखाच आहे. तुमचे पैसे कधी तिप्पट होतील, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्कीमच्या व्याजदराने 114 ला विभाजित करा. याकरता रेट ऑफ रिटर्नचा एक विशेष दर असला पाहिजे. तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी लागणारी वर्ष= 114/रेट ऑफ रिटर्न.

First published:
top videos

    Tags: Fixed Deposit, Investment, Savings and investments