नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : तुम्ही पैसे कमावण्याचा (How to earn money?) मार्ग शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला एका उत्तम व्यवसायाची कल्पना (New Business Idea) देत आहोत. या व्यवसायात वर्षाला 25 हजार रुपये खर्च करून सरासरी 1.75 लाख रुपये (Profitable business) कमावता येतील. हा व्यवसाय म्हणजे मत्स्यपालन (Fish Farming) आहे. भाजीपाला लागवडीसोबतच आता शेतकरी मत्स्यपालनाकडेही (Fisheries) वळू लागले आहेत. सरकार मत्स्य व्यवसायालाही (Fisheries Business) प्रोत्साहन देत आहे. नुकतंच मत्स्योत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्तीसगड सरकारने या व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा दिला आहे. राज्य सरकारने मत्स्योत्पादकांना बिनव्याजी कर्जसुविधा सुरू केली आहे. यासह, मच्छीमारांसाठी अनुदान आणि विमा योजनादेखील सरकारकडून दिली जाते.
आपला मत्स्यपालनाचा व्यवसाय असेल किंवा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल, (Start own business) तर त्यामधल्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भरपूर नफा मिळू शकतो. अलीकडे बायोफ्लॉक तंत्र मत्स्यपालनासाठी (Fish Farming Business by Biofloc Technique) मोठ्या प्रमाणावर वापरलं जात आहे. अनेक जण या तंत्राचा वापर करून लाखोंची कमाई करत आहेत.
हे वाचा - स्मार्टफोन, गाडी चोरी झाल्यास नो टेन्शन, Google करणार हरवलेली वस्तू शोधण्यास मदत
असं आहे तंत्रज्ञान
बायोफ्लॉक तंत्र हे एका जीवाणू आधारित पद्धतीचं नाव आहे. हे तंत्र मत्स्यपालनात खूप साह्यभूत ठरत आहे. यात मोठ्या टाक्यांमध्ये (सुमारे 10-15 हजार लिटरची टाकी) मासे सोडले जातात. या टाक्यांमध्ये पाणी ओतणं, बाहेर काढणं, ऑक्सिजन देणं इत्यादींची चांगली व्यवस्था असते. बायोफ्लॉक बॅक्टेरिया माशांच्या विष्ठेचं प्रथिनांमध्ये रूपांतर करतात. ते मासे परत खातात. त्यामुळे एक तृतीयांश खाद्यबचत होते. पाणीही खराब होत नाही. यासाठी सुरुवातीला खर्च जास्त वाटत असला, तरी नंतर यामधून भरपूर नफादेखील मिळतो. नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्डाच्या (NFDB) मते, 7 टाक्यांसह हा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर सेटअप करण्यासाठी सुमारे 7.5 लाख रुपये खर्च करावे लागतील. तलाव असेल, तर त्यामध्येही मासे ठेवून या व्यवसायातून पैसे कमावता येतील.
2 लाखांपेक्षा जास्त कमाई
गुरबचन सिंग या एका छोट्याशा खेड्यातल्या लहान शेतकऱ्याकडे फक्त 4 एकर जमीन आहे. त्यापैकी 2 एकरात त्याने तलावातला मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला. सिंग सांगतात, 'मी सुमारे 10 वर्षांपूर्वी मत्स्यपालनासंदर्भात एक रेडिओ कार्यक्रम ऐकला होता आणि पारंपरिक शेती सोडून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला. मी मोगा शहरातल्या जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाशी संपर्क साधला. मत्स्यपालन अधिकाऱ्यांनी मला मत्स्यपालनाचं पाच दिवसांचं प्रशिक्षण दिलं.'
गुरबचन त्यांच्या 2 एकरांतल्या मत्स्यपालनातून मिळणाऱ्या उत्पन्नात आनंदी आहे. त्याने जवळच्या कोट सदर खान गावात 2.5 एकर जमीन लीजवर घेऊन तेथे मत्स्यपालनासाठी तलाव बनवला. या व्यवसायातून त्यांना आज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई होते. केंद्र सरकार मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सुविधा देतं. ज्या राज्यात हा व्यवसाय सुरू करायचा आहे, तिथल्या मत्स्यव्यवसायाशी संबंधित कार्यालयात या संदर्भात चौकशी करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business, Fish, Organic farming