मराठी बातम्या /बातम्या /मनी /Earn Money: PPF मध्ये दरमहा गुंतवा 1000 रुपये आणि मिळवा 18 लाखांचा रिटर्न, वाचा कशाप्रकारे?

Earn Money: PPF मध्ये दरमहा गुंतवा 1000 रुपये आणि मिळवा 18 लाखांचा रिटर्न, वाचा कशाप्रकारे?

PPF Account: छोटी गुंतवणूक करून चांगला रिटर्न (How to get Good Return) मिळवायचा असेल तर पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (Public Provident Fund PPF) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

PPF Account: छोटी गुंतवणूक करून चांगला रिटर्न (How to get Good Return) मिळवायचा असेल तर पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (Public Provident Fund PPF) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

PPF Account: छोटी गुंतवणूक करून चांगला रिटर्न (How to get Good Return) मिळवायचा असेल तर पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (Public Provident Fund PPF) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

मुंबई, 14 ऑगस्ट: बचत आणि गुंतवणूक (Saving and Investment) या दोन्ही गोष्टी सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक आहेत. बचत केल्यास गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही केलेली छोटी बचतही फायदेशीर ठरू शकते. छोटी गुंतवणूक करून चांगला रिटर्न (How to get Good Return) मिळवायचा असेल तर पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (Public Provident Fund PPF) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. केंद्र सरकारची गॅरंटी असणाऱ्या या स्कीममध्ये तुम्ही हजार रुपये गुंतवून लाखोंचा फंड मिळवू शकता. यावर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर करसवलत देखील मिळते. PPF च्या मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या रकमेवर देखील कर नाही आहे.

PPF मध्ये आता गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज मिळेल. 30 सप्टेंबरपर्यंत हा व्याजदर असणार आहे. PPF च्या मॅच्युरिटीचा कालावधी 15 वर्षांचा आहे. तुम्ही यानंतर तुमची रक्कम काढून घेऊ शकता किंवा गुंतवणूक पुढे सुरू ठेवण्याचा पर्याय निवडू शकता. मॅच्युरिटीनंतर 5-5 वर्षांच्या कालावधीसाठी तुम्हाला गुंतवणूक वाढवता येईल.

हे वाचा-ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यामुळे भारत सरकार देतंय 12 महिन्यांचा फ्री रिचार्ज?

दरमहा 1000 रुपये गुंतवून कसे मिळवाल 18 लाख?

जर तुम्ही दरमहा 1000 रुपये पीपीएफ मध्ये जमा केलेत, तर मॅच्युरिटीनंतर 15 वर्षांनी ही रक्कम 3.25 लाख रुपये होईल. ही रक्कम गुंतवणुकीच्या वेळी जो व्याजदर आहे, त्यात बदल न होण्याचा अंदाज बांधून निश्चित केली आहे. या 3.25 लाखाच्या रकमेत तुम्ही केलेली गुंतवणूक 1.80 लाख रुपयांची आहे आणि यावर मिळालेली 15 वर्षांच्या कालावधीची व्याजाची रक्कम 1.45 लाख रुपये आहे. आणखी पाच वर्षासाठी तुम्ही ही गुंतवणूक सुरू ठेवली तर तुम्हाला 5.32 लाख मिळतील.

हे वाचा-PIN, CVV, OTP यासारखा तपशील कुणाबरोबरही शेअर करू नका! RBI ने जारी केला अलर्ट

यानंतर आणखी पाच वर्ष गुंतवणूक वाढवली तर तुम्हाला जवळपास 8.24 लाख रुपये मिळतील. अशाप्रकारे गुंतवणूक सुरू ठेवून तुम्ही चांगला रिटर्न मिळवू शकता. जर तुम्ही एकूण 35 वर्ष गुंतवणूक केली तर 18 लाख रुपयांचा फंड उभा करू शकता. दरम्यान तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, तुम्ही लवकर गुंतवणूक सुरू केल्यास या रकमेचा योग्य फायदा तुम्हाला तुम्हाला मिळेल.

First published:

Tags: Open ppf account, PPF