मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

दिसताच गळ्यावर सूज करून घ्या टेस्ट; कॅन्सर, थायरॉईडचं असू शकतं लक्षण

दिसताच गळ्यावर सूज करून घ्या टेस्ट; कॅन्सर, थायरॉईडचं असू शकतं लक्षण

थायरॉईड झालेल्या लोकांसाठी कोबी खाण्याचा सल्ला दिला जातो.

थायरॉईड झालेल्या लोकांसाठी कोबी खाण्याचा सल्ला दिला जातो.

Symptoms of Thyroid: शरीरात थायरॉईड हार्मोन्स (Thyroid Hormone) वाढले किंवा कमी झाले तर, त्यामुळे अनेक समस्या येऊ लागतात. त्यामुळे वेळीचं थायरॉईडची लक्षणं ओळखून टेस्ट करणं आवश्यक आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : दिवसभर जास्तच थकवा जाणवत असेल किंवा ब्रेन फॉग (Brain Fog),वजन वाढणं (Weight Gain) ,थंडी वाजणे किंवा केस गळणं यासारख्या समस्या होत असतील तर थायरॉईड टेस्ट (Thyroid  Test) करून घ्यावी. भरपूर घाम येणं किंवा घबरल्या सारखं वाटणं हे सुद्धा थायरॉईडमुळे होतं. शरीर आणि मेंदू रेग्युलेट करण्याचं काम करणारी थायरॉईड ग्रंथी (Thyroid Hormone) सुद्धा असंतुलित होते. ज्यामुळे शरीराला अनेक समस्यांना (Health Issue) समोरं जावं लागतं. थायरॉईड ग्रंथी शरीरात नेमकं काय काम करते आणि तिने योग्य प्रकारे काम न केल्यास कोणत्या समस्या होतात. त्याची लक्षणं काय असतात हे जाणून घेऊयात.

थायरॉईड ग्रंथीच कार्य

फुलपाखराच्या आकाराची ही ग्रंथी आपल्या घशामध्ये असते. थायरॉईड ग्रंथी आपल्या मेटाबोलिज्मवर कंट्रोल (Metabolising Control) करणारे संप्रेरक निर्माण करते. मेटाबोलिज्म आपल्या शरीराला ऊर्जा वापरण्यास मदत करतं. थायरॉईडचा विकार झाल्यास शरीरात थायरॉईड हार्मोन्सचं उत्पादन रोखून मेटाबोलिज्म मंद होतं आणि हार्मोन्सची पातळी खुप कमी किंवा खुप जास्त होतं. मग शरीरात अनेक लक्षणं दिसायला लागतात.

(फक्त या 7 सवयी लावा; स्मरणशक्ती वाढेल, मेंदू होईल तल्लख)

वजन वाढण किंवा कमी होण

अनियंत्रित वजन हे थायरॉईड डिसऑर्डरच्या लक्षात येणाऱ्या लक्षणांपैकी एक लक्षण आहे. वजन वाढणं म्हणजे शरीररात थायरॉईड हार्मोन्सची पातळी घसरत असल्याचं लक्षण आहे. ज्याला हायपोथायरॉडीझम म्हणतात. तर, थायरॉईड शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त हार्मोन्स तयार करत असेल,तर वजन अचानक कमी होऊ लागतं. त्याला हायपरथायरॉईडीझम म्हणतात. हायपोथायरॉडीझम एक सामान्य आजार आहे.

मानेवर सूज

मानेला सूज येणं सुरू झाले तर, ओळखावं की थायरॉईडमध्ये काहीतरी गडबड आहे. गळ्यावर गाठ येणं हे हाइपोथायरॉडीझम किंवा हायपरथायरॉडीझममुळे होऊ शकतं. कधीकधी मानेमध्ये सूज येणं हे थायरॉईड कॅन्सर किंवा थायरॉईड नोड्यूलमुळे होऊ शकतं. गळ्यावर आलेली गाठ केवळ थायरॉईडची असेल असं नाही.

(नका बाळगू लाज! महिलांमध्ये वाढतोय हा आजार; उपचार न केल्यास होतात दुष्परिणाम)

हृदयची गती बदलणे

शरीरात थायरॉईड हार्मोन्स शरीरातल्या प्रत्येक अवयवावर परिणाम करतात अगदी हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम करतात. हायपोथायरॉडीझम असलेल्या लोकांच्या हृदयाची गती सामान्यपेक्षा कमी असते. तर, हायपरथायरॉडीझममुळे हृदयाची गती वेगवान होते याशिवाय ब्लड प्रेशर, हृदयाची धडधड किंवा गती देखील ट्रिगर करू शकते.

एनर्जी आणि मूड बदलत हातो

थायरॉईडचा एनर्जी लेव्हर आणि मूडवर मोठा परिणाम होऊ शकतो. हायपोथायरॉडीझममुळे थकवा,सुस्ती आणि नैराश्य येतं. दुसरीकडे, हायपरथायरॉडीझममुळे स्ट्रेस, झोपेचा त्रास,अस्वस्थता आणि चिडचिड होऊ शकते.

(खराब झालेल फर्निचर चमकवा अवघ्या काही मिनिटांत; वापरा ‘या’ सोप्या Tips)

केस गळणे

थायरॉईड हार्मोन संतुलित नसल्याचं केस गळणं हे एक लक्षण आहे.  हायपोथायरॉडीझम आणि हायपरथायरॉडीझम दोन्ही केस गळण्यास कारणीभूत ठरू शकतात. बहुतेकदा थायरॉईड डिसऑर्डरवर उपचारांनंतर केस परत वाढतात.

प थंड किंवा गरम वाटणं

थायरॉईड शरीराचं तापमान नियंत्रित करण्याची क्षमता बिघडवू शकतो. हायपोथायरॉडीझम असलेल्या लोकांना नेहमीपेक्षा थंड वाटू शकतं. तर, हायपरथायरॉडीझमचा उलटा परिणाम होतो. ज्यामुळे जास्त घाम येतो आणि गरम वाटत राहतं.

(शंभरीतही विशीतील जोश! 100 वर्षांची आजी जगातील सर्वात वयस्कर पॉवरलिफ्टर)

हायपोथायरॉडीझमची इतर लक्षण

कोरडी त्वचा. तुटणारी नखं, हातात सुन्नपणा किंवा मुंग्या येणं,बद्धकोष्ठता, अव्यस्थित मासिक पाळी चक्र,

हायपरथायरॉडीझमची इतर लक्षण

स्नायू कमकुवत होणं किंवा हाताला कंप येणं, लुज मोशन्स, अनियमित मासिक पाळी, यापैकी कोणतीही लक्षणं दिसत असतील तर, थायरॉईड टेस्ट करून घ्या आणि डॉक्टरांशी संपर्क साधा.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Women