वॉशिंग्टन, 10 ऑगस्ट : सध्या सर्वांचं लक्ष टोकियो ऑलिम्पिककडे आहे. याचदरम्यान एका शंभर वर्षांच्या आजीनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 100 वर्षांची आजी जगातील सर्वात वयस्कर पॉवर लिफ्टर (Power lifting) ठरली आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Guinness Book Of Records) या आजीची हेव्ही वेट उचलणारी (Heavy Weight) जगातील वयस्कर महिला म्हणून नोंद झाली आहे (World’s oldest powerlifter). अमेरिकेच्या फ्लोरिडातील एडिथ मुर्वे-ट्रेनिया (Edith Murway-Traina) 8 ऑगस्टला 2021 ला त्यांनी वयाची शंभरी गाठली आहे. एडिथ या सध्या जगातील सर्वात वयोवृद्ध पॉवरलिफ्टर आहेत.
एडिथ यांनी एका मित्राच्या सांगण्यावरून वयाच्या 90 व्या वर्षी वर्कआऊटला (Work Out) सुरुवात केली. त्यापूर्वी त्या डान्स टिचर होत्या. मात्र आता त्या दररोज जीममध्ये वर्कआऊट करतात. हे वाचा - Bigg boss - जुन्या कपड्यांपासून सेक्सी ड्रेस; अॅक्टिंगसह कटिंगमध्ये तरबेज उर्फी विशेष म्हणजे या वयातही त्या 30 किलो वजन उचलत बेंच प्रेस (Bench Press) करतात. एवढे वय असूनही त्यांना डेडलिफ्ट करणं आवडतं. त्यांना जीममध्ये वर्कआऊट करताना पाहून लोकं आश्चर्य व्यक्त करतात. मी हे लक्ष्य साध्य करू शकेन असं मला वाटत नसताना देखील मी ते साध्य केल्याचं एडिथ सांगतात. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला असून, त्यात एडिथ बेंच प्रेस (Bench Press) करताना दिसत आहेत. हे वाचा - चांगलं आरोग्य हवं असेल तर या वेळी नका पिऊ पाणी; जास्त पाणीही ठरतं घातक याबाबत एडिथ यांची मुलगी हनी कॉट्रेल यांनी सांगितलं, “माझी आई ही हेव्हीवेट उचलणारी जगातील सर्वात वयोवृद्ध महिला आहे, हे मला माहिती होतं. पण जेव्हा तिचं नाव रेकॉर्डमध्ये नोंदलं गेलं तेव्हा माझ्या आनंदाला पारावर उरला नाही”