मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

चिमुकलीला दूध पाजण्यास पत्नीनं दिला नकार, पतीनं पंख्याचा रॉड डोक्यात घालून जागेवरच संपवलं

चिमुकलीला दूध पाजण्यास पत्नीनं दिला नकार, पतीनं पंख्याचा रॉड डोक्यात घालून जागेवरच संपवलं

पतीने पत्नीच्या डोक्यात उभ्या पंख्याच्या खालील लोखंडी रॉड घालून हत्या केल्याची घटना घडली आहे.

पतीने पत्नीच्या डोक्यात उभ्या पंख्याच्या खालील लोखंडी रॉड घालून हत्या केल्याची घटना घडली आहे.

पतीने पत्नीच्या डोक्यात उभ्या पंख्याच्या खालील लोखंडी रॉड घालून हत्या केल्याची घटना घडली आहे.

भिवंडी, 20 जुलै : भिवंडी तालुक्यात पुर्णा इथे आपल्या पोटच्या अकरा महिनीच्या चिमुरडीस पत्नीने स्तनपान करण्यास नकार दिल्याच्या रागातून गुरुद्वारात पुजारी म्हणून काम करणाऱ्या पतीने पत्नीच्या डोक्यात उभ्या पंख्याच्या खालील लोखंडी रॉड घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पूजा जाधव (वय 23) असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव असून भजनसिंग सरादरसिंग जाधव (वय 25) असं अटक केलेल्या पतीचे नाव आहे. आरोपी भजनसिंग सरादरसिंग जाधव व पत्नी पूजा हे पुर्णा इथे गुरुद्वारात राहत असून तिथेच पती भजनसिंग सरादरसिंग जाधव हा पुजारी म्हणून काम करत आहे. त्यांना अकरा महिन्याची चिमुरडी असून पहाटे दूध पिण्यासाठी मुलगी रडत होती. संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांशी 'दिलकी बात' वाढदिवसाला होणार प्रसारित यामुळे भजनसिंग याने पत्नी पूजाला उठवून चिमुरडीस दूध पाजण्यास सांगितलं असता तिने त्यास नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये वाद मोठा झाला. यावेळी राग अनावर झालेल्या पती भजनसिंग सरादरसिंग जाधव याने लोखंडी पंख्याचा स्टँडचा रॉड पत्नीच्या डोक्यात घातला. पुण्यात जर लॉकडाऊन वाढलं तर आम्ही आत्मदहन करू, व्यापारी वर्गाचा थेट इशारा जबर जखम झाल्यामुळे पूजा रक्तबंबाळ झाली. वेळेवर उपचार न झाल्यामुळे तिचा जागेवरच मृत्यु झाला. या प्रकरणाची माहिती नारपोली पोलिसांना कळताच पोलीस पथक घटनास्थळी धाव घेत आरोपी पती भजनसिंग सरादरसिंग जाधव यास अटक केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पवारांवर लिहलेली अश्लील पोस्ट पोलीस पाटलाला भोवली, अशी झाली कारवाई मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी आरोपी पतीला न्यायालयात हजर केले असता त्यास 26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी करत आहेत. या घटनेमुळे चिमुरडीने एकाच वेळी आपल्या आई आणि वडिलांना गमावलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
First published:

पुढील बातम्या