मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पवारांच्या मुलाखतीनंतर संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांशी 'दिलकी बात' वाढदिवसाला होणार प्रसारित

पवारांच्या मुलाखतीनंतर संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांशी 'दिलकी बात' वाढदिवसाला होणार प्रसारित

देश आणि राज्य स्तरावरचे विविध प्रश्नं आणि सध्या कोरोना संक्रमण काळातील आव्हानं यावर ही मुलाखत असणार आहे.

देश आणि राज्य स्तरावरचे विविध प्रश्नं आणि सध्या कोरोना संक्रमण काळातील आव्हानं यावर ही मुलाखत असणार आहे.

देश आणि राज्य स्तरावरचे विविध प्रश्नं आणि सध्या कोरोना संक्रमण काळातील आव्हानं यावर ही मुलाखत असणार आहे.

मुंबई, 20 जुलै : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विशेष मुलाखत घेतली आहे. येत्या 27 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमीत्ताने दरवर्षी संजय राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतात. मात्र या वर्षी उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्ष प्रमुख सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही आहेत. त्यामुळे देश आणि राज्य स्तरावरचे विविध प्रश्नं आणि सध्या कोरोना संक्रमण काळातील आव्हानं यावर ही मुलाखत असणार आहे. येत्या 25, 26 आणि 27 जुलै रोजी ही मुलाखत सामना डिजीटलच्या माध्यातून प्रसिद्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासंबंधी संजय राऊत यांनी फेसबुक पोस्टही शेअर केली आहे. यात उद्धव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल असा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यांनी लिहलं की, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत सामना साठी घेतली. सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे मिळाली. उद्धव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल. करोना पासून राम मंदिरा पर्यंत मुख्यमंत्री ठाकरे दणक्यात बोलले. मुलाखत 25 26 जुलै रोजी वाचता पहाता येईल.' महाराष्ट्रात आजही 8240 रुग्णांची उच्चांकी वाढ, 176 जणांचा मृत्यू दरम्यान, मागच्या आठवड्यामध्ये राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. करोना महामारी, महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग, चीनचा पश्न या अनेक विषयांवर शरद पवार यांनी चोख उत्तरं दिली होती. एकच शरद सगळे गारद असं या मुलाखतीचं मुख्य शीर्षक होतं. पुण्यात जर लॉकडाऊन वाढलं तर आम्ही आत्मदहन करू, व्यापारी वर्गाचा थेट इशारा ही मुलाखत 3 भागांमध्ये प्रसारित करण्यात आली होती. याच मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तास्थापनेच्या नाट्यावर भाष्य केलं होतं. 'पहाटे शपथविधी झाला तेव्हा अनेकांनी पवारांना आरोपाच्या पिंजऱ्यात ठेवले होते. पण तेव्हा हे शरद पवार योद्ध्यासारखे उभे राहिले. लॉकडाऊन, डेडलॉक तोडून त्यांनी सरकार स्थापन केले,' अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी पवारांची स्तुती केली होती. पवारांवर लिहलेली अश्लील पोस्ट पोलीस पाटलाला भोवली, अशी झाली कारवाई 'ही खिचड़ी नाही, हे सरकार तीन पक्षांनी येत तयार केलं आहे. ते पाच वर्षे टिकेल. सत्ता स्थापन प्रक्रियेविषयी शरद पवारांची खुली मुलाखत घ्यायची होती, पण काही कारणानं ती मागे पडली. पवार साहेबांच्या खासगी मुलाखती शेकडो घेतल्यात, पण खुली मुलाखत आता घेत आहे. अन्य राजकीय नेत्यांच्याही मुलाखती घेणार आहे,' असं संजय राऊत यांनी स्पष्ट होतं.
Published by:Renuka Dhaybar
First published:

पुढील बातम्या