• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • खाकी वर्दीतला लाचखोर, अधिकाऱ्याचा प्रताप ऐकून पोलीस दल हैराण

खाकी वर्दीतला लाचखोर, अधिकाऱ्याचा प्रताप ऐकून पोलीस दल हैराण

यापूर्वीही हुंबरे साताऱ्यात नियुक्तीला असताना त्यांच्यावर लाचलुचपत विभागाने पैसे घेताना रंगेहाथ अटक केली होती.

  • Share this:
पुणे, 27 मे : पुणे शहर पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) म्हणून कार्यरत असणारे दीपक हुंबरे या अधिकाऱ्याने गुन्ह्यात न अडकविण्यासाठी आरोपीकडूनच 40 हजाराची खंडणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातारा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे, दीपक हुंबरे हा सक्तीच्या रजेवर होता. तरीही हुंबरे याने पोलीस गणवेशात सातारा जिल्ह्यात गेला आणि त्याने गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन 40 हजार रुपयांची खंडणी घेऊन पुण्यात आला. हा प्रकार समोर आल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे यांच्याविरोधात सातारा जिल्ह्यातील भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 21 वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे.  फिर्यादी तरुण भुईंज शहरातील रहिवाशी असून तो व्यावसायिक आहे. 15 दिवसांपूर्वी त्याने भुईंज परिसरात गोळीबार केला होता. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र, तो फरार झाल्यामुळे त्याच्या मित्राकडे चौकशी सुरू होती. हेही वाचा -धडक दिल्यानंतर झाडासह टँकर धावत होता, विचित्र अपघाताचा VIDEO व्हायरल गोळीबार प्रकरणात आरोपींना पोलीस मारहाण करणार नाहीत, असं परस्पर सांगून हुंबरे याने 40 हजार रूपये घेतले होते. खंडणीसाठी 50 हजारांची बोलणी झाली होती. त्यापैकी हुंबरे याने 40 हजार रुपये घेतले होते. यापूर्वीही हुंबरे साताऱ्यात नियुक्तीला असताना त्यांच्यावर लाचलुचपत विभागाने पैसे घेताना रंगेहाथ अटक केली होती. हुंबरे हे लाचखोरी करण्याबाबत कुख्यात म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हुंबरेला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी प्रकरणाचा अहवाल शासनास सादर केला असून लवकरच निलंबनाची कारवाई अपेक्षित आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली.
Published by:sachin Salve
First published: